मेळघाटातील टंचाईग्रस्त गावे होणार टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:09+5:30

दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा टँकरव्दारे करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गावे पाणीटंचाई आराखड्यात मागील कित्येक वर्षांपासून उपाययोजनांसाठी समाविष्ट असतात. परिणामी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अजूनही पाणीपुरवठ्याची स्थिती बदलेली नाही.

Tanker-free villages in Melghat will be tanker-free | मेळघाटातील टंचाईग्रस्त गावे होणार टँकरमुक्त

मेळघाटातील टंचाईग्रस्त गावे होणार टँकरमुक्त

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : कायमस्वरूपी उपाययोजनांचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. आतापर्यंत लाखो रुपये पाण्यासारखे खर्च झाले असले तरी या गावांची पाणीटंचाई मात्र काही केल्या दूर झालेली नाही. त्यामुळे या गावांना कायमस्वरूपी पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने संयुक्तरीत्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अध्यक्षांनी ३ जुलै रोजी दिले आहेत.
दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा टँकरव्दारे करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गावे पाणीटंचाई आराखड्यात मागील कित्येक वर्षांपासून उपाययोजनांसाठी समाविष्ट असतात. परिणामी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अजूनही पाणीपुरवठ्याची स्थिती बदलेली नाही. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, सोनापूर, सोमवारखेडा, मलकापूर, तारूबांदा, धरमडोह, मनभंग, पाचडोंगरी, कोरडा, कोयलारी या गावांचा यात समावेश आहे. यामधील पाचडोंगरी व कोयलारी या दोन गावाकरिता डोमा येथून पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. कोरडा येथे अस्तित्वातील योजनेकरिता नव्याने उदभव घेऊन सदरचे काम पूर्ण करण्यात आलेले आहेत. परंतु, वीज पुरवठ्याअभावी योजना सुरू करता आली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपेद्र कोराटे यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीदरम्यान सांगितले.

इतर टँकरग्रस्त गावांना कायमस्वरूपी योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरठा विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे.
- राजेंद्र सावळकर,
कार्यकारी अभियंता

दोन विभागांत समन्वय ठेवा
दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जाणाऱ्या मेळघाटातील गावांना कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्याचे दृष्टीने झेडपी पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता तयारी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिल्या आहेत.

Web Title: Tanker-free villages in Melghat will be tanker-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी