तालुका तहानलेलाच पाणी नियोजन बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:07+5:30

१०५ पैकी अनेक गावांमध्ये पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची वणवण वाढतच चालली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली. त्या पाईपलाईनवर व्हॉल्व बसविण्यात आलेत. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे मात्र पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

Taluka Tahanlela water planning failed | तालुका तहानलेलाच पाणी नियोजन बिघडले

तालुका तहानलेलाच पाणी नियोजन बिघडले

Next
ठळक मुद्देपाण्यासाठी वणवण : हात धुवायलाही पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तळवेल : चांदूर बाजार तालुक्यातील १०५ गावांना नदीवरील धरणातून पाणीपुरवठा योजना सुरू आहे. परंतु नियोजनाअभावी ग्रामीण भाग उन्हाळ्यात पाण्यासाठी आसुललेला आहे. १०५ पैकी अनेक गावांमध्ये पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची वणवण वाढतच चालली आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली. त्या पाईपलाईनवर व्हॉल्व बसविण्यात आलेत. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे मात्र पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्या व्हॉल्वमधून सतत पाणी जात असल्याने त्यावर शेवाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्हॉल्वशेजारी श्वानांचा मुक्त वावर आहे. आजूबाजूला नागरिक थुंकतात. बाजूला गुटख्याच्या रिकाम्या पुड्या असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Taluka Tahanlela water planning failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी