सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:03+5:302021-07-10T04:10:03+5:30

अमरावती : येथील मिश्रा चौकातील एका किराणा दुकानाजवळून एमएच २७ सीके ३९४६ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १२ जून ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अमरावती : येथील मिश्रा चौकातील एका किराणा दुकानाजवळून एमएच २७ सीके ३९४६ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १२ जून रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी रमेश जांबेकर (रा. मोरगड) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

सावळापुरात दळणाच्या कारणावरून मारहाण

आसेगाव : अचलपूर तालुक्यातील सावळापूर येथील राहुल वानखडे (२९) याला काठीने मारहाण करण्यात आली. दळणाच्या कारणातून मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. आसेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नारायण हागोणे (५६, सावळापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

घोगर्डा येथे महिलेला मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील घोगर्डा येथील एका ४५ वर्षीय महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. तर तिच्या पतीला लोटृून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ६ जुलै रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी रहिमापूर पोलिसांनी आरोपी शाम अंबादास धांडे (५०) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

खिरगव्हाण येथून दुचाकी लंपास

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील खिरगव्हाण येथील संतोष गावंडे (३३) यांच्या घरासमोरून त्यांची एमएच २७ सीडी ४२९० या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. २९ जून रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी गावंडे यांच्या तक्रारीवरून ७ जुलै रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

तेलीपुरा येथून सिलिंडर लंपास

अंजनगाव सुर्जी : येथील तेलीपुरा भागात वितरण करण्यास गेलेल्या वाहनामधून २२०० रुपये किमतीचे सिलिंडर चोरीला गेले. ७ जुलै रोजी सकाळी हा प्रकार घडला. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी या प्रकरणी संतोष सरकटे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

एसटी प्रवासादरम्यान सोन्याचा हार लंपास

दर्यापूर : अमरावती दर्यापूर या एसटी प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून एक लाख ११ हजार ४५५ रुपये किमतीचा सोन्याचा हार लंपास करण्यात आला. १ जुलै रोजी सकाळी ११ ते ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी ७ जुलै रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावीत

अमरावती : महाडीबीटी पोर्टवरील कृषी योजनांसाठी जिल्ह्यात सहा हजार १५२ शेतकऱ्यांची पात्र लाभार्थी म्हणून लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. तथापि, त्यांतील केवळ दोन हजार ६९६ शेतकऱ्यांनीच कागदपत्रे अपलोड केली आहेत. उर्वरित शेतकरी बांधवांनी तत्काळ कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

---------------

शनिवारी कोर्टाचे कामकाज बंद

अमरावती : जिल्ह्यातील सर्व अपीलीय, तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे कामकाज शनिवारी, १० जुलैला होणार नाही. तसा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला एस. जोशी-फलके यांनी निर्गमित केला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही काळ न्यायालयीन कामकाज बंद असल्याने त्याची भरपाई म्हणून शनिवारच्या सुट्ट्यांच्या दिवशी कामकाज चालू ठेवण्याचा निर्णय यापूर्वी झाला. तथापि, जिल्हा लेव्हल ३ मध्ये आल्यानंतर एका सत्रात काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सध्या एका सत्रात काम सुरू आहे. त्याला अनुसरून १० जुलै रोजी कामकाज होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------

विभागीय लोकशाही दिन १२ जुलै रोजी

अमरावती : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने १२ जुलै रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाद्वारे किंवा संकेतस्थळावर सादर कराव्यात. लोकशाही दिनात नागरिक व्यक्तिश: हजर राहू शकतात, असे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

--------------

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध व्हावी कारवाई

नेरपिंगळाई : मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निवेदन आझाद हिंद संस्थेकडून सरपंच, ग्रामविकास अधिकारी नेरपिंगळाई यांना देण्यात आले. यावेळी संस्थापक-अध्यक्ष ऋषिकेश थोटांगे, उपाध्यक्ष अजय दुर्गवार, सचिव ओम माहोरे, सदस्य धनराज दुर्गवार उपस्थित होते.

--------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.