हॉटस्पॉट ठरलेल्या शिवनगर परिसरात साबण-पाण्याची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:35+5:30

साबण-पाण्याच्या द्रावणात (हँडवॉश) कोरोना विषाणू २० सेकंदात नष्ट होतो. या तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद तज्ज्ञ प्रवीण विधळे यांच्या मार्गदर्शनात शिवनगर भागातील सुमारे ६०० घरांची दारे, अंगण, गेट, गाड्यांवर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सायंकाळच्या सुमारास निरमा व रिन पावडरचे पाण्यातील मिश्रण फवारण्यात आले.

Soap-water spray in Shivnagar area which is a hotspot | हॉटस्पॉट ठरलेल्या शिवनगर परिसरात साबण-पाण्याची फवारणी

हॉटस्पॉट ठरलेल्या शिवनगर परिसरात साबण-पाण्याची फवारणी

Next
ठळक मुद्देसंडे अंकर : मराठी विज्ञान परिषद-महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या शिवनगर, संतोषीनगर भागात दोन दिवसांत साबण-पाण्याची फवारणी करण्यात आली.
साबण-पाण्याच्या द्रावणात (हँडवॉश) कोरोना विषाणू २० सेकंदात नष्ट होतो. या तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद तज्ज्ञ प्रवीण विधळे यांच्या मार्गदर्शनात शिवनगर भागातील सुमारे ६०० घरांची दारे, अंगण, गेट, गाड्यांवर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सायंकाळच्या सुमारास निरमा व रिन पावडरचे पाण्यातील मिश्रण फवारण्यात आले. त्याचवेळी नागरिकांना मास्कसह घरातील सर्व वस्तूंना अशाच द्रावणाने धुवून काढण्यास सांगण्यात आले. प्रवीण गुल्हाने यांच्या नेतृत्वात ३० पेक्षा अधिक युवक व महापालिकेचे २० कर्मचारी असे ५० जण यात राबले. त्यांनी आधी घरोघरी माहिती पत्रकाचे वाटप करीत परिसरातील बहुतांश अंगणामध्ये फवारणीसाठी नागरिकांचे मत बनविले. पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या परवानगीने हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय वानरे, नीता राऊत, धीरज हिवसे, माधुरी ठाकरे यांच्यासह योगेश पिठे, धनंजय शिंदे, अनिल गोहर, गावनेर, प्रमोद पांडे, प्रदीप बाजड, मिलिंद सराफ, नरेशचंद्र काठोळे, संदीप गोडबोले, प्रशांत साखरकर, दीपक कोल्हे, मंगेश बडनखे आदी उपस्थित होते.

Web Title: Soap-water spray in Shivnagar area which is a hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.