मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर अपघात, सहा जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 07:22 PM2021-12-01T19:22:15+5:302021-12-01T19:23:05+5:30

Amravati News मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

Six killed in road accident on Pattan-Multai road in Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर अपघात, सहा जण ठार

मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर अपघात, सहा जण ठार

Next

अमरावती : मध्य प्रदेशातील पट्टण-मुलताई मार्गावर नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मध्य प्रदेशातील तिवरखेड येथून पट्टण मार्गे मुलताईला जाणारी खासगी प्रवासी बस (एमएच ३१ सीजी ४४१९) ला मुलताईकडून पट्टणकडे धान्य घेऊन येणाऱ्या ट्रक (एमपी ४८ एच ०६१९) ने धडक दिली. यामुळे बसचा चुराडा झाला, तर ट्रक उलटून रस्त्याच्या कडेला पडला. ट्रकचा चालक व वाहक फरार झाले असून जखमींना मुलताई पोलीस आणि नागरिकांनी मुलताई रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे

Web Title: Six killed in road accident on Pattan-Multai road in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात