नमुने चाचणीचे कर्तव्य बजावताना सहा तास पाण्याविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:01:12+5:30

अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्ये ४ मेपासून नमुने चाचणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे दोन हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल पाठविले आहे. परंतु, चाचणीसाठी येणारे नमुने हाताळताना मोठी रिस्क आहे. रुग्णांचे स्वॅब आल्यानंतर त्याच्या कोल्ड चेनबाबतची खात्री करण्यात येते. रोसोटिंग चमू ही पीपीई कीट परिधान करून नमुन्यांची अनपॅकिंग, बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये स्वंतत्र रूममध्ये करण्यात येते.

Six hours without water while performing the duty of testing the samples! | नमुने चाचणीचे कर्तव्य बजावताना सहा तास पाण्याविनाच!

नमुने चाचणीचे कर्तव्य बजावताना सहा तास पाण्याविनाच!

Next
ठळक मुद्देसंकल्प : विद्यापीठ प्रयोगशाळेत ‘कोरोना वॉरियर्स’

गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोशाळेत थ्रोट स्वॅब तपासणीचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, सहा तास पाण्याविना नमुने चाचणीचे कर्तव्य बजवावे लागते, असा धोकादायक प्रवास येथील कोरोना वॉरियर्स करीत असल्याची माहिती आहे.
अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्ये ४ मेपासून नमुने चाचणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत येथे दोन हजारांपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल पाठविले आहे. परंतु, चाचणीसाठी येणारे नमुने हाताळताना मोठी रिस्क आहे. रुग्णांचे स्वॅब आल्यानंतर त्याच्या कोल्ड चेनबाबतची खात्री करण्यात येते. रोसोटिंग चमू ही पीपीई कीट परिधान करून नमुन्यांची अनपॅकिंग, बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये स्वंतत्र रूममध्ये करण्यात येते. हा स्वॅब नंतर आरएनए एक्सट्रॅक्शन रूममध्ये स्थलातंरित केला जातो. या स्वंतत्र कक्षामध्ये बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये त्याचे नमुने आर.एन.ए. कीट वापरून कोरोना विषाणूचे कोट प्रोटीन व आर.एन.ए. विलगिकरण केल्या जाते. आर.एन.ए. हा विशिष्ट फिल्टरमधून विलगीकरण करून ते आयसोलेट केले जातात. उर्वरित स्वॅब हा विशिष्ट पद्धतीने नष्ट केला जातो. या रूममध्ये संसर्गाचा धोका टाळण्याकरिता पीपीई व इतर घटक महत्वाचे कार्य करतात.
साधारणत: सहा तास पाण्याविना हे कर्तव्य बजवावे लागते. आरएनए हा नंतर प्रिपिसीअर रूममध्ये स्थलांतरित केला जातो. या कक्षामध्ये आर.टी. पीसीआरचे मिश्रण बनवून त्यामध्ये आर.एन.ए. टाकला जातो. साधारणत: ९६ ट्यूबमध्ये रिअ‍ॅक्शन लावली जाते. येथेसुद्धा कामे बायोसंसर्गमध्ये करण्यात येतात. विद्यापीठ प्रयोगशाळेत नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, नीरज घनवटे, प्रशांत गावंडे हे आधारस्तंभ म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सोबतीला संजयसिंह ठाकूर हेदेखील आहेत.

निगेटिव्ह की पॉझिटिव्ह ! - असा ठरतो अहवाल
विद्यापीठात आर.टी. पीसीआर कक्षामध्ये दोन मशीन उपबल्ध आहेत. यात ए.बी.आय. स्टेप वन प्लस व रोटार झोन या आहेत. यामध्ये साधारण: ६० नमुने चाचणी केले जातात. नमुने किती करता येतील, याचा रेशो हा आर.टी. कीटवर अंवलबून आहे. चाचणीत ई- जीन व आर. डी.पी.आर. करता येते. तसेच एन. जीन स्पाईक प्रोटीन व ओआरएफ-१ हे जीन विशिष्ट स्थ्रेशहोल्डवर टेस्ट केल्या जातात. या टेस्टमध्ये दोन जीन जर स्थ्रेशहोल्डच्यावर गेले तर त्यास पॉझिटिव्ह, दोनपैकी एक असेल तर इन्कमक्लुसीन दोन्हीही नसतील तर निगेटिव्ह आणि आर. एन.एन.पी. नसेल तर रिजेक्टेड, असे अहवाल दिले जातात.

Web Title: Six hours without water while performing the duty of testing the samples!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.