सलग सहा तास बचावकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:00 AM2020-11-21T05:00:00+5:302020-11-21T05:00:33+5:30

अचलपूर तालुक्यातील भूगाव येथून सन १९७५ मध्ये धारणीला आलेल्या सुधाकर ठाकरे यांनी ९० च्या दशकात पाच हजारांच्या भांडवलावर टिनाचा खोका विकत घेऊन मुख्य महामार्गालगत दुकान लावले. १९९३ मध्ये दुकानाला आग लागली. त्यातही प्रचंड नुकसान झाले. पुन्हा नातेवाईक व सहकाऱ्यांच्या मदतीने व्यवसाय उभा केला. सन २०१८ मध्ये दुकानाला मागील बाजूने आग लागली. लगेच आग विझवल्याने नुकसान टळले. शुक्रवारी धारणी शहराचा आठवडी बाजार व घुंगरू बाजार असल्याने लाखो रुपयांचा माल भरला. मात्र, पहाटेच्या आगीत सर्व काही जळून खाक झाले.

Six hours of rescue work in a row | सलग सहा तास बचावकार्य

सलग सहा तास बचावकार्य

Next
ठळक मुद्दे क्षणार्धात होत्याचे नव्हते, १०० मीटरवर पेट्रोलपंप, नागरिकांचे सहकार्य

  पंकज लायदे
    लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : अख्खे धारणीकर गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास मुख्य ओळीतील दुकानांना आगीने वेढा घातला. सुरुवातीला १५ दुकाने खाक झाल्याचे दिसत होते. मात्र, तो आकडा तब्बल ३३ वर जाऊन पोहोचला. कोट्यवधींची साधनसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ती आग १०० मीटर अंतरावरील पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती, तर काय अनर्थ घडला असता, या विचारानेच धारणीकरांसोबत प्रशासकीय यंत्रणेची पाचावर धारण बसली. त्यामुळे सगळेच आग विझविण्यासाठी एकत्र आले. सलग सहा तास बचावकार्यानंतर हा अग्नितांडव आटोक्यात आला. मात्र, तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले. 
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सजगतेने आगीची माहिती महसूल व नगरपंचायत यंत्रणेकडे पोहोचली. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह अख्खी यंत्रणा पहाटेच घटनास्थळी दाखल झाली. तातडीने संपर्क यंत्रणा राबविल्याने आगीवर उशिरा का होईना, नियंत्रण मिळविता आले. 
१९९३ नंतर पुन्हा आगीचा तडाखा 
अचलपूर तालुक्यातील भूगाव येथून सन १९७५ मध्ये धारणीला आलेल्या सुधाकर ठाकरे यांनी ९० च्या दशकात पाच हजारांच्या भांडवलावर टिनाचा खोका विकत घेऊन मुख्य महामार्गालगत दुकान लावले. १९९३ मध्ये दुकानाला आग लागली. त्यातही प्रचंड नुकसान झाले. पुन्हा नातेवाईक व सहकाऱ्यांच्या मदतीने व्यवसाय उभा केला. सन २०१८ मध्ये दुकानाला मागील बाजूने आग लागली. लगेच आग विझवल्याने नुकसान टळले. शुक्रवारी धारणी शहराचा आठवडी बाजार व घुंगरू बाजार असल्याने लाखो रुपयांचा माल भरला. मात्र, पहाटेच्या आगीत सर्व काही जळून खाक झाले. आता उभे राहायचे तरी कसे, असा ठाकरे यांचा आर्त सवाल काळीज भेदणारा होता. शुक्रवारच्या आगीमुळे अनेकांची आर्थिक घडीच कोलमडली.

आठवडाभर आगीची मालिका
आठवडाभरात पाच ठिकाणी आग लागली. धारणी शहरातील अन्नपूर्णा ज्वेलर्स,  कुसुमकोट येथील मालवीय यांचा गुरांचा गोठा, तर खापरखेडा येथील मोबीन खान याच्या शेतातील ऊस पिकाला आग लागली. गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास झिलांगपाटी येथे सिलूबाई सावलकर यांचे घर जळून खाक झाले.

 

Web Title: Six hours of rescue work in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.