तामिळनाडूतून ‘त्या’ पोहचल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:01:01+5:30

तामिळनाडूतील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या त्या चौघी लॉकडाऊनमध्ये अडकल्या. काही दिवसानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर झाला. आपली आपबिताी सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना पांढरी व पळसोना येथे स्वगृही आणण्यास यश लाभले. गावी सुखरूप पोहचताच त्यांच्या आई वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला.

‘She’ reached from Tamil Nadu | तामिळनाडूतून ‘त्या’ पोहचल्या

तामिळनाडूतून ‘त्या’ पोहचल्या

Next
ठळक मुद्देखासगी कंपनीत कामावर : लॉकडाऊनमध्ये होत्या अडकून

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : तालुक्यातील पांढरी आणि पळसोना येथील चार मुली तब्बल तीन ँमहिन्यांनंतर स्वगृही परतल्या आहेत. त्या तामिळनाडू येथे अडकल्या होत्या.
तामिळनाडूतील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या त्या चौघी लॉकडाऊनमध्ये अडकल्या. काही दिवसानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर झाला. आपली आपबिताी सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना पांढरी व पळसोना येथे स्वगृही आणण्यास यश लाभले. गावी सुखरूप पोहचताच त्यांच्या आई वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. पांढरी येथील रेखा धुर्वे , दुर्गा इडपाची तर पळसोना येथील गायत्री मसराम व कांचन परतेती या चार मुली तामिळनाडू राज्यातील एका शहरातील खासगी कंपनीत पाच महिन्यांपूर्वी कामावर लागल्या होत्या. व्हॉट्सअ‍ॅप वरून अनेकांना व्हिडीओ तसेच माहिती देऊन त्यांना सहकार्य मिळाले नाही. अखेर आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक पंधरे यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि धामणगावचे माणिक तोडसाम यांच्यासोबत संपर्क केला. आमदार पटेल यांनी तामिळनाडू प्रशासनासोबत अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपर्क केला. त्या बुधवारी वरूड तालुका मुख्यालयी व तेथून आपआपल्या गावी पोहोचल्या. बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या परतण्याची माहिती महसूलला देण्यात आली. त्यांनी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले.

Web Title: ‘She’ reached from Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.