तीन देशी बनावटीच्या पिस्टलसह तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:00 AM2021-02-12T05:00:00+5:302021-02-12T05:01:07+5:30

पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पथकाने छापा टाकून सदर युवकाच्या घरी देशी बनावटीच्या पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळताच छापा टाकून सदर पिस्टल व तलवार जप्त करण्यात आली. आरोपी घटनास्थळी सापडला नाही. त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे.

Seized sword with three indigenously made pistols | तीन देशी बनावटीच्या पिस्टलसह तलवार जप्त

तीन देशी बनावटीच्या पिस्टलसह तलवार जप्त

Next
ठळक मुद्देनागपुरीगेट पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपुरीगेट पोलिसांनी येथील अलीमनगरात छापा टाकून एका युवकाच्या घरातून तीन देशी बनावटीच्या पिस्टल व एक तलवार असा एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी  सकाळी करण्यात आली. पोलिसांनी इकबाल खान अकबर खान (२८, रा. अलीमनगर, गुलजारनगरजवळ) या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. 
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पथकाने छापा टाकून सदर युवकाच्या घरी देशी बनावटीच्या पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळताच छापा टाकून सदर पिस्टल व तलवार जप्त करण्यात आली. आरोपी घटनास्थळी सापडला नाही. त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध अवैधरीत्या अग्निशस्त्र व शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Seized sword with three indigenously made pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस