‘व्याघ्र’मध्ये सॅनिटायझर ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:02:03+5:30

चिखलदरा पर्यटनस्थळाला लागून संपूर्ण जंगल मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या संपूर्ण परिसरात दररोज वाघ, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरच होते. कोरोनापासून वाघांचे संरक्षण करण्यात व्याघ्र प्रकल्प व प्रशासन तत्पर असताना, कोरोनापासून या वन्यप्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे.

Sanitizer track in ‘Tiger’ | ‘व्याघ्र’मध्ये सॅनिटायझर ट्रॅक

‘व्याघ्र’मध्ये सॅनिटायझर ट्रॅक

Next
ठळक मुद्देखबरदारी । प्रकल्पात प्रवेशापूर्वी वाहनांचे निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातील वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी जंगल सफारीला येणाऱ्या वाहनाचे नाक्यावरच सॅनिटायझेशन केले जात आहे. त्यासाठी सॅनिटायझर टँकची व्यवस्था येथे करण्यात आली.
चिखलदरा व धारणी या दोन्ही शहरांत कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्णांवर अमरावती, अचलपूर येथे उपचार होत आहेत. त्याची लागण मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, गुगामल व मेळघाट वन्यजीव विभागाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या वन्यप्राण्यांना होऊ नये, यासाठी आता पावले उचलण्यात आली आहेत. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, शिवाबाला एस., विनोद शिवकुमार, चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर भैलुमे, ढाकणाचे हिरालाल चौधरी, सेमाडोहचे सम्राट मेश्राम, गाविलगडचे डी.एच. वाळके, घटांगच्या निशा मोकाशे, हरिसालच्या दीपाली चव्हाण आदींना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी
चिखलदरा पर्यटनस्थळाला लागून संपूर्ण जंगल मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या संपूर्ण परिसरात दररोज वाघ, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरच होते. कोरोनापासून वाघांचे संरक्षण करण्यात व्याघ्र प्रकल्प व प्रशासन तत्पर असताना, कोरोनापासून या वन्यप्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनसुद्धा स्थानिक रहिवासी उल्लंघन करीत असून, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पर्यटनस्थळासह वन्यप्राण्यांनाही कोरोनापासून धोका निर्माण झाला आहे.

अशी आहे टँकची रचना
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत वैराट जंगल सफारीसाठी जाण्यापूर्वी पर्यटकांसह व्याघ्र प्रकल्पाचे प्रत्येक वाहन सॅनिटाईज केले जाते. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी ६ बाय ४ मीटर व खोली २ फूट आहे. जवळपास एक हजार लिटरच्या टँकमध्ये नगरपालिकेने दिलेले सॅनिटायझर टाकले जाते.

जंगल सफारीसाठी जाणारे प्रत्येक वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटाईज करण्यात येत आहे. वैराट जंगल सफारीपूर्वी वनपरिक्षेत्र महाविद्यालयाच्या नाक्यावर विशेष आकाराचा टँक बनविला आहे.
- मयूर भैलुमे
वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा

Web Title: Sanitizer track in ‘Tiger’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.