समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:02+5:30

समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची दैना झाली आहे. याशिवाय समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतासंबंधी पाणी साचणे, पाणी अडणे, रस्त्याचा प्रश्न आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी या रस्त्यासंबंधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Road misery due to Samrudhi Highway work | समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्यांची दैना

समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्यांची दैना

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी। विविध विभागांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर/चांदूर रेल्वे : समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची दैना झाली आहे. याशिवाय समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतासंबंधी पाणी साचणे, पाणी अडणे, रस्त्याचा प्रश्न आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी या रस्त्यासंबंधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अप्पर वर्धा प्रकल्पाचे खराब झालेले निरीक्षण पथ, कालवे, पाटचऱ्या या अनुषंगाने १६ जून रोजी माजी आमदार वीरेंद्र जगताप, एमएसआरडीसीच्या अधीक्षक अभियंता संगीता जयस्वाल, कार्यकारी अभियंता गजानन पळसकर, उपअभियंता एनसीसी कंपनीचे प्रमुख निरजकुमार, अप्पर वर्धाचे कार्यकारी अभियंता सोळंके, पीएमजीएसचे कार्यकारी अभियंता खान, जिल्हा परिषदेचे उपअभियंता कदम व देशमुख, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता वैद्य, उपअभियंता काळमेघ, कोहळे व रंभाड आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी चांदूर रेल्वे, धामणगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत पाहणी दौरा करण्यात आला. आष्टा, तळणी, निंभोरा बोडखा, निंभोरा राज, कळाशी, तळेगाव दशासर, निमगव्हाण, धोत्रा, वाढोणा, किरजवळा, शेलुनटवा, मंगरुळ चवाळा, शिवणी रसुलपूर, वेणी गणेशपूर, लोहोगाव येथे ते गेले. पाहणी केली.
अधीक्षक अभियंता संगीता जयस्वाल यांच्यापुढे स्थानिक शेतकरी, नागरिकांनी समस्या मांडल्या. त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: Road misery due to Samrudhi Highway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.