४० गावांचा रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:46+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीपुढे परवानगी मिळालेली नाही.

Road to 40 villages is fatal | ४० गावांचा रस्ता जीवघेणा

४० गावांचा रस्ता जीवघेणा

Next
ठळक मुद्देप्रशासन नियमात गुरफटले : दरड कोसळू लागल्या, मोठ्या अपघाताची भीती

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमांपुढे सार्वजनिक बांधकाम विभागाने नांग्या टाकल्या आहेत. मात्र, पहाडावरून कोसळणाऱ्या दरडी मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहेत. तालुक्यातील घटांग ते काटकुंभपर्यंतचा रस्ता परिसरातील ४० गावखेड्यांतून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीपुढे परवानगी मिळालेली नाही. संरक्षित आणि अतिसंरक्षित परिक्षेत्र घोषित केल्याने दगडाला हात लावण्याचीही परवानगी नाही. तोसुद्धा एक मोठा गंभीर गुन्हा आहे. परिणामी परतवाडा, घटांग ते काटकुंभपर्यंत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमारेषेपर्यंत जात असलेला हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरड कोसळून ढिगाºयाखाली दबून जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीयूष मालवीय व सहकाऱ्यांनी केली आहे.

बांधकाम विभागाचे बांधले हात
घटांग ते जारिदापर्यंत मध्य प्रदेशचा भाग वगळता रस्ता देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, कोसळलेली दरड, दगड उचलल्यास व्याघ्र आणि वनविभागातर्फे कारवाईच्या नोटीसचे पत्र पाठविले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडी उचलणे बंद केले आहे.

घरी परतण्याची हमी नाही
काटकुंभ, चुरणी, जारिदा ते अतिदुर्गम हतरू परिसरातील ४० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांतील शेकडो नागरिकांसाठी काटकुंभ ते घटांग मार्ग सोईचा आहे. चिखलदरा, धारणी आणि परतवाडा येथे जाण्यासाठी जवळचा असलेल्या घटांगपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या घाटवळणातून उंच पहाडावरून मोठ्या प्रमाणात दरड, दगड, माती, झाडे कोसळत आहे. त्या ढिगाऱ्याखाली कधी अपघात होईल, याची शाश्वती नाही. परिणामी घरी परत जाण्याची हमी उरलेली नाही.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दरडी उचलायचा. वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचा बडगा आल्याने त्यांनीच रस्त्यावरील गौण खनिज, माती, झाडे उचलण्याबाबत पत्र पाठविले आहे.
- मिलिंद पाटणकर,
उपविभागीय अभियंता

घटांग ते मध्यप्रदेशच्या कुकुरूपर्यंत रस्त्यावर कोसळलेले दगड उचलण्यासह काही कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या दरडींची पाहणी करून अपघात होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
- निशा मोकाशे
वनपरिक्षेत्र अधिकारी, घटांग

Web Title: Road to 40 villages is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.