धोका वाढला, चाचण्यांना गती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:02:04+5:30

जिल्ह्यातील नमुने सुरुवातीला एम्स, नागपूर येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आले व मागच्या आठवड्यापर्यंत येथे तपासणी करण्यात आली. नागपूर व अन्य जिल्ह्यांत कोरोना संक्रमितांच्या संख्येत वेगाने वाढ व पर्यायाने नमुन्यांची संख्यावाढ झाल्याने एम्सच्या लॅबवर ताण वाढला. त्यामुळे नागपूरसोबतच अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत अमरावती येथील नमुने पाठविण्यास सुरुवात झाली.

The risk increased, when did the tests speed up? | धोका वाढला, चाचण्यांना गती केव्हा?

धोका वाढला, चाचण्यांना गती केव्हा?

Next
ठळक मुद्देविद्यापीठ लॅबमध्येच तपासणी : नागपूर, सेवाग्राम, अकोला येथे नमुने पाठविणे बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेड झोन असणाऱ्या महापालिका क्षेत्रात संक्रमित व्यक्ती त्वरेने निष्पन्न होण्यासाठी त्या व्यक्तीचा, तिच्या निकटतम संपर्कातील व्यक्तींचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल लवकर प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. मात्र, या आठवड्यात अहवालास विलंब व नमुुने रिजेक्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या वाढत्या संख्येच्या पार्र्श्वभूमीवर चाचणी अहवालास होणारा विलंब धोकादायक ठरणारा आहे.
जिल्ह्यातील नमुने सुरुवातीला एम्स, नागपूर येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आले व मागच्या आठवड्यापर्यंत येथे तपासणी करण्यात आली. नागपूर व अन्य जिल्ह्यांत कोरोना संक्रमितांच्या संख्येत वेगाने वाढ व पर्यायाने नमुन्यांची संख्यावाढ झाल्याने एम्सच्या लॅबवर ताण वाढला. त्यामुळे नागपूरसोबतच अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत अमरावती येथील नमुने पाठविण्यास सुरुवात झाली. यासोबत सेवाग्राम येथील लॅबमध्येही नमुने पाठविलेत. त्यामुळे अमरावतीच्या संशयितांचे अहवाल दिवसभरात दोन-तीन वेळा मिळायला लागले. दरम्यान, अमरावती येथेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी)मध्ये विषाणू परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती आली. येत्या आठवड्यात पीडीएमसीची लॅबदेखील सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यापीठातील लॅबमध्ये परीक्षण सुरू होताच नागपूर, अकोला व वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे नमुने पाठविणे थांबविण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १५० नमुन्यांचे दररोज विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत परीक्षण केले जात असल्याने तेथेही ताण वाढतोय. या प्रयोगशाळेत सुरुवातीला दिवसाला २४ व नंतर ४८, आता त्यापेक्षा जास्त नमुन्यांचे परीक्षण केले जात आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे, त्याच्या तुलनेत नमुने कमी घेतले जात आहेत. विद्यापीठ प्रयोगशाळेवरही आता ताण वाढत असल्याने परीक्षणाला विलंब होतो व त्यामुळे संक्रमित निष्पन्न झाल्यानंतरच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे वास्तव आहे.

‘ट्रूनॉट’ कार्यान्वित केव्हा?
कोरोनाचे संशयित रुग्ण त्वरेने निष्पन्न व्हावेत, त्यांच्यावर लगेच उपचार होऊन अन्य व्यक्ती संक्रमित होऊ नये, किंबहुना कोरोनाची साखळी बे्रक व्हावी, यासाठी जिल्ह्याला एक ट्रूनॉट मशीन उपलब्ध झाली असून, ती पीडीएमसीत लावली आहे. तासाभरात नमुन्याचा अहवाल येतो. पॉझिटिव्ह असल्यासच त्या नमुन्याची आरटी-पीसीआर तपासणी केली जावी व याद्वारे लॅबवर येणारा ताण कमी व्हावा, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, आठ दिवसांत ही यंत्रणाच कार्यान्वित झालेली नाही.

विद्यापीठाकडून प्राप्त अहवाल
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला १७ मे रोजी ७५ नमुने पाठविले, ८९ अहवाल प्राप्त झाले. १८ मे रोजी १३८ नमुने पाठविले, ८३ अहवाल प्राप्त झाले. १९ मे रोजी १३९ नमुने पाठविले, १३७ अहवाल प्राप्त झाले. २३ मे रोजी १४६ नमुने पाठविले, ११२ अहवाल प्राप्त झाले. २२ मे रोजी १५१ नमुने पाटविले, ५६ अहवाल प्राप्त झाले. २१ मे रोजी ९२ नमुने पाठविले, ९१ अहवाल प्राप्त झाले. २० मे रोजी ७६ पाठविले, तर १४८ अहवाल प्राप्त झाले आहेत.

Web Title: The risk increased, when did the tests speed up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.