‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:00 AM2020-11-13T05:00:00+5:302020-11-13T05:00:26+5:30

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे.

Risk of corona infection from ‘Mumbai Return’ monks? | ‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

Next
ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ?

 गणेश वासनिक
    लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या रोडावली असली तरी मुंबईहून परत पाठविलेल्या भिक्षुकांपासून शहरवासीयांना कोविड-१९चा धोका वाढला आहे. मुंबईहून आलेल्या या भिक्षुकांच्या माध्यमातून शहरात कोरानाची दुसरी लाटही पसरू शकते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. 
मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मुंबईत भीक मागून उपजिविका चालविणारे बहुतांश पारधी समाजातील महिला, पुरुष हे कुटुंबीयांसह अमरावतीत दाखल झाले आहेत. यात काही नजीकच्या गाव-खेड्यांतील व्यक्तींचासुद्धा समावेश आहे. चार ते पाच महिन्यांपासून मुंबईहून परतलेल्या भिक्षुकांनी अमरावतीत महत्त्वाच्या चाैकात ठिय्या मांडला आहे. यात राजकमल चौक, श्याम चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, रेल्वे स्टेशन चौक, बसस्थानक परिसराचा समावेश आहे. 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे. दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये दररोज भीक मागणाऱ्यांची संख्या २२५ च्या घरात  आहे. मुंबइईहून शहरात दाखल झालेल्यांची संख्या २०० च्या घरात आहे. चार-साडेचारशे भिक्षुक सतत वाहनचालकांच्या संपकार्त येत असल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना म्हणजे काय?
मुंबई बंद होणार म्हणून तेथून हाकलले. एप्रिलपासून मूळ गावी पाेहोचलो. गावात उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे भीक मागून चार महिन्यांपासून अमरावतीत जगत आहे. कोरोना, मास्क काय आहे, हे माहिती नसल्याचे एकाने सांगितले. 

रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देणार कोण?
रस्त्यावरील भिक्षुकांना पोट भरण्याची चिंता आहे. मिळेल ते खाणे आणि उघड्यावर जगणे, अशी त्यांची जीवनशैली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत आहे. त्यामुळे सामाजिक स्ंघटना अथवा कार्यकर्त्यांनी  रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सिग्नलवर भिक्षुकांची गर्दी ही बाब अशोभनीय आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणेनिहाय बाहेरगावच्या भिक्षुकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचे नियोजन आखले आहे. बुधवारपासून कार्यवाही सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वीच भिक्षुकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घराकडे पाठविले जाणार आहे.
- अशोक लांडे,  वाहतूक पोलीस निरीक्षक, पूर्व विभाग.

Web Title: Risk of corona infection from ‘Mumbai Return’ monks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.