‘त्या’ कोरोनाग्रस्त जावयावर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:01:13+5:30

जरूडचा जावई असलेली नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील एक व्यक्ती मुंबईवरून पत्नी व मुलासह थेट सासरी जरुडला आली. हे जावई ५ जून रोजी नागपूर येथे कोरोना संक्रमित आढळले. त्याअनुषंगाने एका डॉक्टरसह पाच कुटुंबांतील १९ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना बेनोडा येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे. त्या कोरोनाग्रस्त जावयावर राष्ट्रीय आपाती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याची मागणी जरूडवासीयांनी केली आहे.

Report a crime if it is coronated | ‘त्या’ कोरोनाग्रस्त जावयावर गुन्हे नोंदवा

‘त्या’ कोरोनाग्रस्त जावयावर गुन्हे नोंदवा

Next
ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी, जरूडमध्ये स्मशानशांतता, डॉक्टरसह १९ क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
जरड : मुंबईहून परतल्यानंतर तब्बल सहा दिवस मुक्काम करून दुसऱ्याचे प्राण धोक्यात घालणाºया ‘त्या’ कोरोनाबाधित जावयावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी जरूड ग्रामस्थांनी केली आहे. जावयाच्या भेटीनंतर संपूर्ण जरूङ लॉकडाऊन करण्यात आले असून, भीतीने सर्व ग्रामस्थांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.
जरूडचा जावई असलेली नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील एक व्यक्ती मुंबईवरून पत्नी व मुलासह थेट सासरी जरुडला आली. हे जावई ५ जून रोजी नागपूर येथे कोरोना संक्रमित आढळले. त्याअनुषंगाने एका डॉक्टरसह पाच कुटुंबांतील १९ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना बेनोडा येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे. त्या कोरोनाग्रस्त जावयावर राष्ट्रीय आपाती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याची मागणी जरूडवासीयांनी केली आहे.
दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी जरूड कंटेनमेंट झोन घोषित केले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनीसुद्धा जरूडला भेट दिली. वैद्यकीय पथकाद्वारे त्या जावयाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू आहे. सदर व्यक्ती कुणाच्या संपर्कात आली असेल, तर त्यांनी स्वत: प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन ठाणेदार मगन मेहते यांनी केले आहे.

दडलेल्या लोकांचे काय?
कोरोना लॉकडाऊनदरम्यान मुंबई, पुणे तसेच परप्रांतांतून हजारो नोकरदार, विद्यार्थी तालुक्यात परतले. काहीच लोकांनी नोंदी केल्या, तर काही भूमिगत होऊन घरातच वास्तव्यास आहेत. शेजाऱ्यांना माहिती असूनही कोणीही सांगत नाही. यामुळे त्या लोकांचा शोध घेणार तरी कोण, हा प्रश्न आहे. पुन्हा कोरोना ब्लास्ट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे .

Web Title: Report a crime if it is coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.