तापी नदीवरील पुनर्भरण योजनेमुळे होणार हरितक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:03 AM2019-04-13T01:03:07+5:302019-04-13T01:03:54+5:30

मेळघाटातील खाऱ्या-घुटी येथे धरण बांधले जाणार आहे. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी कालव्याच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण केले जाईल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा खान्देशसह संपूर्ण अमरावती जिल्ह्याला होणार आहे.

The recharge of Tapi River will result in Green Revolution | तापी नदीवरील पुनर्भरण योजनेमुळे होणार हरितक्रांती

तापी नदीवरील पुनर्भरण योजनेमुळे होणार हरितक्रांती

Next
ठळक मुद्देआनंदराव अडसूळ यांचा विश्वास : अमरावती जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील खाऱ्या-घुटी येथे धरण बांधले जाणार आहे. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी कालव्याच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण केले जाईल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘टास्क फोर्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा खान्देशसह संपूर्ण अमरावती जिल्ह्याला होणार आहे. शासनाचा हा निर्णय ‘सुजलाम् सुफलाम’ प्रदेशाच्या दिशेने वाटचाल करणारा असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी धारणी येथील प्रचार सभेत व्यक्त केला.
व्यासपीठावर शैलू मालवीय, अनिल मालवीय, अप्पा पाटील, सुखदेव शनवारे, श्याम गंगराडे, टिल्लू तिवारी, भगवान मुंडे यांच्यासह भाजप-शिवसेना-रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना अडसूळ म्हणाले, हा प्रकल्प जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी भूजल पातळी वाढण्यास साहाय्यभूत ठरू शकणारा तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणासाठी भारतीय सैन्याने परवानगी दिली आहे. शासनाचे डीपीआर तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ‘लिडार’ या आधुनिक पद्धतीने हे सर्वेक्षण केले आहे. या प्रकल्प अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, विरोधक या प्रकल्पाचा कोणताही अभ्यास न करता आदिवासींची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान होण्याची भीती आनंदराव अडसूळ यांनी वर्तविली.

तापी प्रकल्पाचे हे आहेत फायदे
तापी नदीतून गुजरातला वाहून जाणाºया ४५.५० टीएमसी पाण्याचा वापर होईल. ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. या योजनेमुळे प्रत्यक्ष १ लाख २ हजार हेक्टरवर सिंचन होईल. महाराष्ट्राला २ लाख ३७ हजार, तर मध्य प्रदेशला १ लाख ७४ हजार हेक्टरमध्ये लाभ होईल. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राला २० टीएमसी, तर मध्य प्रदेशला २५.५० टीएमसी असे ४५.५० टीएमसी पाणी तापी नदीतून वापरता येणार आहे. भूमिगत बंधारे, गॅबिअन बंधारे, पुनर्भरण विहिरी, इंजेक्शन वेल्स व साठवण बंधारे बांधून त्याद्वारे पुनर्भरण केले जाईल. खोल गेलेली भूगर्भातील पाणीपातळी उंचावणे आणि निर्माण होणाºया पाणीसाठ्याद्वारे सिंचन करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाला ९९५८ कोटी खर्च अपेक्षित आहे.

Web Title: The recharge of Tapi River will result in Green Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.