संत्र्याच्या मृृग बहाराला पावसाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:26+5:30

वरूड तालुका हा संत्र्याकरिता जगप्रसिद्ध आहे. संत्र्याची आंबट-गोड चव आखाती देशांनीही चाखली आहे. या पिकाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुखवस्तूपणाला आता कुणाची नजर लागली आहे. संत्री हे आरोग्यवर्धक फळ असून, संत्र्याचा मृग बहर घ्यायचा असल्यास, त्या संत्र्याच्या झाडाला ओलित हे मे महिन्यात बंद करावे लागते. तेव्हा कुठे एक महिन्याच्या ताणावर असताना फुले येण्यास झाडे तयार होते.

Rain hits orange deer spring! | संत्र्याच्या मृृग बहाराला पावसाचा फटका!

संत्र्याच्या मृृग बहाराला पावसाचा फटका!

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये भीती : मे अखेरपर्यंत बागांचे केले ओलित

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूराबाजार : संत्र्याचा मृग बहर हा शंभर टक्के जून महिन्यात येणाºया पावसावर अवलंबून असतो. परंतु, अवेळी येणाºया पावसामुळे यावर्षी संत्र्याचा मृग बहर धोक्यात येण्याची भीती सध्या शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वरूड तालुका हा संत्र्याकरिता जगप्रसिद्ध आहे. संत्र्याची आंबट-गोड चव आखाती देशांनीही चाखली आहे. या पिकाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुखवस्तूपणाला आता कुणाची नजर लागली आहे. संत्री हे आरोग्यवर्धक फळ असून, संत्र्याचा मृग बहर घ्यायचा असल्यास, त्या संत्र्याच्या झाडाला ओलित हे मे महिन्यात बंद करावे लागते. तेव्हा कुठे एक महिन्याच्या ताणावर असताना फुले येण्यास झाडे तयार होते. मध्येच बेमोसमी पाऊस आल्यास मृग बहर हा अडचणीत येऊ शकतो. मृग नक्षत्राचा पाऊस साधारणत: १० जून ते २० जून येण्याचा अंदाज घेऊन काही शेतकऱ्यांनी यावर्षी ४५-४६ अंश सेल्सिअस तापमानात मे अखेरपर्यंत संत्राबागांचे ओलित केले.
झाडे ताणावर असताना पाने चिम घेतात व झाडे अत्यवस्थ अवस्थेला प्राप्त होतात. मात्र, मृगाचा पाऊस सुरू झाल्यानंतर संत्रा फूट म्हणजे फुले, पालवी येण्यास सुरुवात होते. त्यानुसार संत्र्याची मशागत वर्षभर असते. आता पाऊस आल्यास मृग धोक्यात येऊ शकतो, असा संत्राउत्पादकाचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी संत्रा झाडावर आताच वाढरोधक कीटकनाशक हे तीन मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अंबादास हुच्चे
शास्त्रज्ञ, नागपूर

मी २० मे पासून ओलित बंद केले आता जर पाऊस आला व नंतर पावसाने ओढ दिली, तर मृग बहर नक्कीच अडचणीत येईल.
- अतुल पाटील
शेतकरी, गाडेगाव

Web Title: Rain hits orange deer spring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.