व्यापारी संकुलाची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:52+5:30

महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी सध्याच्या रेडीकरेकननुसार भाडेवाढ निश्चित केली होती. यापूर्वीचे भाडे नाममात्र असल्याने ही दरवाढ निश्चित केली होती. प्रिदर्शनीसह खत्री मार्केटचे करारनामे महापालिकेने नियमबाह्य ठरविले होते. याविरोधात प्रियदर्शनी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती व नव्या दराचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला.

Promotion of commercial packages | व्यापारी संकुलाची दरवाढ

व्यापारी संकुलाची दरवाढ

Next
ठळक मुद्देभाडेपट्ट्याचे नूतनीकरण दहा वर्षांसाठी : समितीला मिळाले अधिकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलाच्या दरवाढीसह भाडेपट्टीचे अधिकार आता जिल्हाधिकारी, आयुक्त व सहजिल्हानिबंधक (मुद्रांक) यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे लीज संपलेल्या खापर्डे, खत्री व प्रियदर्शनी मार्केटच्या गाळे दरवाढीचा प्रश्न निकाली निघाला आहे. या नव्या धोरणामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्याची आशा आहे.
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी सध्याच्या रेडीकरेकननुसार भाडेवाढ निश्चित केली होती. यापूर्वीचे भाडे नाममात्र असल्याने ही दरवाढ निश्चित केली होती. प्रिदर्शनीसह खत्री मार्केटचे करारनामे महापालिकेने नियमबाह्य ठरविले होते. याविरोधात प्रियदर्शनी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती व नव्या दराचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला. हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला असला तरी तो महासभेने नामंजूर केला व विखंडणासाठी शासनाकडे पाठविला होता. याबाबत शासनाकडून पत्र अप्राप्त असतानाच नवी अधिसूचना प्रशासनाला प्राप्त झालेली असल्याने आता या पद्धतीनेच व्यापारी संकुलातील भाडेपट्टीचा करारनामा व गाळ्यांची दरवाढ समितीकडून होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अधिनियमानुसार मालमत्ता मूल्यांकनाच्या ८ टक्के रक्कम किंवा बाजारभावानुसार निश्चित होणारे वार्षिक भाडे यापैकी जे अधिक असेल तेवढे वार्षिक भाडे समिती निश्चित करणार आहे. भाडेपट्याचे नूतनीकरण १० वर्षांसाठी राहणार आहे. ज्या कारणांसाठी गाळा भाड्याने दिलेला आहे, त्याच कारणांसाठी वापरला जाणे अनिवार्य आहे. महापालिकेला देय असलेल्या रकमेचा विहित मुदतीत भरणा न केल्यास ही मिळकत महापालिकेकडे जमा करण्यास पात्र राहणार आहे. यासह अनेक महत्त्वाच्या अटी व शर्ती अधिनियमात असल्याने महापालिकेस पूरक ठरणार आहे.

महापालिकेच्या मालकीची २७ संकुले
महापालिकेच्या मालकीची एकूण २७ व्यापारी संकुले आहेत. यामध्ये श्याम चौक, खापर्डे संकुल, जे अ‍ॅन्ड डी मॉल, जवाहर गेट, प्रियदर्शनी संकुल, चपराशीपुरा, माहात्मा फुले संकुल, राजापेठ संकुल, देशगौरव सुभाषचंद्र बोस संकुल, दस्तुरनगर संकुल, अंबादेवी रोड प्रशासकीय संकुल, गाडगेबाबा संकुल, आरटीओ कार्यालयाजवळ, विलासनगर संकुल, वडाळी संकुल, भाजीबाजार संकुल, आदर्श नेहरू संकुल, माहात्मा गांधी संकुल, राहुलनगर संकुल, छायानगर मटन मार्केट, इतवारा बाजार मटन मार्केट, बडनेरा येथील कोंडेश्वर व्यापारी संकुल, जयहिंंद मैदान, सावता मैदान, वसंतराव नाईक संकुल, मौलाना आझाद संकुल, अशी २७ संकुले महापालिकेच्या मालकीची आहेत.
 

Web Title: Promotion of commercial packages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.