धामणगावात ‘त्या’ पुस्तकाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:00 AM2020-01-15T06:00:00+5:302020-01-15T06:00:20+5:30

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे यावेळी परीक्षित जगताप यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी.

Prohibition of 'that' book in Dhammanga | धामणगावात ‘त्या’ पुस्तकाचा निषेध

धामणगावात ‘त्या’ पुस्तकाचा निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : शास्त्री चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने मंगळवारी धामणगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री चौकात आंदोलन केले गेले.
‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे यावेळी परीक्षित जगताप यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी. या षड्यंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविश बिर, शहराध्यक्ष नितीन कनोजिया, ऋषी जगताप, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, आशिष शिंदे, सुधीर शेळके, अनिल शेळके, नितीन देशमुख संतोष पळसापुरे, वैभव पावडे, सभापती महादेवराव समोसे, पंकज वानखडे, सागर शुभम चौबे यांची उपस्थिती होती.

Web Title: Prohibition of 'that' book in Dhammanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.