‘आत्मनिर्भर भारता’साठी कृषी विकासाला प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:01:01+5:30

कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात शेतीचा एवढा अग्रक्रमाने विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले, हे देशाचे भाग्य आहे. त्यांनी शेती विकासाचा प्राधान्याने विचार केला. त्यांच्या विचारांचे मूल्य मोठे आहे.

Priority should be given to agricultural development for a 'self-reliant India' | ‘आत्मनिर्भर भारता’साठी कृषी विकासाला प्राधान्य द्यावे

‘आत्मनिर्भर भारता’साठी कृषी विकासाला प्राधान्य द्यावे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देश सर्वार्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी कृषिक्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेती विकासाचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.
 श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले व्यासपीठावर होते.
कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात शेतीचा एवढा अग्रक्रमाने विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले, हे देशाचे भाग्य आहे. त्यांनी शेती विकासाचा प्राधान्याने विचार केला. त्यांच्या विचारांचे मूल्य मोठे आहे. ज्या काळात देश दुष्काळाचा मुकाबला करत होता, त्या काळात कृषीविषयक कार्याला प्राधान्य देऊन पंजाबरावांनी शेती विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केले, त्यातून देशात कृषी क्रांती घडून आली, असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले.
कृषिक्षेत्रात जिओ टॅगिंगसारखे होणारे नवे प्रयोग अत्यंत उपयुक्त आहेत, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांनी अविरत निष्ठेने केलेल्या कामगिरीमुळे देशाला उपासमारीचे संकट भेडसावण्याची वेळ आली नाही. माझी स्वत:ची बांधीलकी शेतीशी आहे. त्यामुळे शेतीविषयक संस्थांबाबत मला विशेष आस्था आहे, असे आवर्जून सांगून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी कृषी महाविद्यालय सुरू होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 
भाऊसाहेबांनी सुरू केलेली ही संस्था भविष्यात अधिक विकसित व व्यापक व्हावी तसेच शेती अध्ययनासाठी एक आदर्श प्रारूप ठरावी, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.     
महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख.  संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन दिलीप इंगोले यांनी केले.

 

Web Title: Priority should be given to agricultural development for a 'self-reliant India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.