पंतप्रधानांच्या हस्ते करणार रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 05:00 AM2021-09-18T05:00:00+5:302021-09-18T05:00:55+5:30

खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखाना निर्माणकार्याची पाहणी केली. वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२  पर्यंत पूर्ण करण्यात यावी, अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’ करून त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

The Prime Minister will inaugurate the Railway Wagon Factory | पंतप्रधानांच्या हस्ते करणार रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते करणार रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे निर्माणकार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी कोरोनाकाळात खासदार राणा यांनी अथक परिश्रम करून ८० कोटींचा निधी खेचून आणला. या कारखान्याचे निर्माणकार्य येत्या २०२२ मध्ये पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाईल, असा संकल्प खासदार नवनीत राणा यांनी सोडला. 
खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखाना निर्माणकार्याची पाहणी केली. वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२  पर्यंत पूर्ण करण्यात यावी, अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’ करून त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
बडनेरा जुना महामार्गवरून जाणाऱ्या  अमरावती- बडनेरा रेल्वे लाईनवर खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या अथक प्रयत्नांनी जुनी वस्ती येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग  मंजूर झाला.  या उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा खासदार  राणा यांनी  केली. यावेळी खासदार नवनीत रवि राणा यांच्यासमवेत डीपीएम भट्टाचार्य, स्टेशन मास्तर  सिन्हा, आरपीएफ मानस, नरवाल, इवनाते, सुनील राणा, जितू दुधाने, अजय जयस्वाल, अयूब खान, विलास वाडेकर, प्रवीण सावळे, सोनू रुंगठा, रऊफ पटेल, नितीन बोरेकर, नानकराम नेभनाणी, अजमत खान, आफताब खान, नील निखार आदी उपस्थित होते.

Web Title: The Prime Minister will inaugurate the Railway Wagon Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.