वाहतुकीस अडथळा, दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:13 AM2021-04-15T04:13:14+5:302021-04-15T04:13:14+5:30

अमरावती : रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध भातकुली पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. सद्दाम खान ...

Obstruction of traffic, crime on both | वाहतुकीस अडथळा, दोघांवर गुन्हा

वाहतुकीस अडथळा, दोघांवर गुन्हा

Next

अमरावती : रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध भातकुली पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. सद्दाम खान फरीद खान (२६, रा. बिसमिल्लानगर) व मतीन खान रहीद खा (२९, रा. बाभळी, दर्यापूर)अशी आरोपीचे नाव आहे. दोन्ही वाहनचालकांनी भातकली रस्त्यावर दुचाकी उभी करून वाहतुुकीला अडथळा निर्माण केल्याचे पोलिसांना आढळून आले.

----------------------------------------------------------------

बच्छराज प्लॉटमधून संशयित अटकेत

अमरावती : कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री गस्ती दरम्यान बच्छराज प्लॉट परिसरात एका संशयित आरोपीला अटक केली. मोहम्मद दिशान मोहम्मद आसीफ(२०, रा. पठाण चौक) असे आरोपीचे नाव आहे.

------------------------------------------

तडीपार आरोपीला अटक

अमरावती : राजमातानगर परिसरातूृन कोतवाली पोलिसांनी मंगळवारी एका तडीपार आरोपीस अटक केली. रतन वसंत उके (४१, रा. राजमातानगर) असे आरोपीचे नाव आहे. कोम्बींग ऑपरेशन दरम्यान सदर आरोपी कायद्याचे उल्लंघन करून शहरात फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. ही कारवाई पीएसआय राम गिते यांनी केली.

Web Title: Obstruction of traffic, crime on both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.