आता कामगार नोंदणीसाठी ‘ऑन द स्पॉट’ ‘रॅपिड टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:00 AM2021-06-23T05:00:00+5:302021-06-23T05:00:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणासाठी सध्या कामगारांची तोबा गर्दी उसळली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ...

Now 'On the Spot' 'Rapid Test' for worker registration | आता कामगार नोंदणीसाठी ‘ऑन द स्पॉट’ ‘रॅपिड टेस्ट’

आता कामगार नोंदणीसाठी ‘ऑन द स्पॉट’ ‘रॅपिड टेस्ट’

Next
ठळक मुद्देगंभीर दखल, तोबा गर्दीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणासाठी सध्या कामगारांची तोबा गर्दी उसळली आहे. याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्राद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  ग्रामीणची नोंदणी तालुक्यात तर शहरातील कामगार नोंदनी वाॅर्डनिहाय करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले आहेत. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑन द स्पॉट’  रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५०,१४० कामगारांची नोंदणी व १०,२१७ कामगारांनी नूतनीकरण केले आहे. सध्यादेखील ही प्रक्रिया सुरूच असल्याचे सरकारी कामगार अधिकार अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.
 जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर बांधकाम कामगार व मंडळ अंतर्गत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांनाही प्रत्येकी १,५०० रुपयांच्या मदतीची घोषणा शासनाने केली होती. त्यापूर्वीदेखील कामगारांची नोंदणी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात या कार्यालयात कामगारांच्या रांगा लागल्या होत्या. आता प्रत्यक्ष कामगारांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने नूतनीकरणासाठी मोठी गर्दी उसळलेली आहे.कोरोनाकाळात वाढती गर्दी व कामगारांच्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लक्षणे असलेल्या कामगारामच्या जागीच रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती राहुल काळे यांनी दिली.

बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरणासाठी मोठी गर्दी असल्याने त्या विभागाला महापालिकेच्या वाॅर्डनिहाय नोंदणी करण्याच्या, तालुक्याला नोंदणी करण्याच्या व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी

९० दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक
बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी त्याने किमान ९० दिवस काम केले असले पाहिजे. यासाठी संबंधित कंत्राटदार, ग्रामसेवक किंवा महापालिकेने प्राधिकृत केलेले अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराची नोंदणी होते व दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. 

 

Web Title: Now 'On the Spot' 'Rapid Test' for worker registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.