-आता गृह विलगीकरणास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:01:06+5:30

संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. झोन अंतर्गत चाचण्या वाढविण्यात याव्या. यासंदर्भात सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे. सुपर स्प्रेडरला तपासणीकरिता सूचित करावे. झोन स्तरावर कंटेनमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. विवाह समारंभात उपस्थिती मर्यादा व मास्क वापरणे बंधनकारक आहे.

-Now house separation is prohibited | -आता गृह विलगीकरणास मनाई

-आता गृह विलगीकरणास मनाई

googlenewsNext
ठळक मुद्देकंटेनमेंट झोन, क्वारंटाईन सेंटर पुन्हा होणारसुपर स्प्रेडरच्या तपासण्या वाढवा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  गृह विलगीकरणाला आवश्यक परिस्थितीतच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावरच यापुढे भर द्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आरोग्य यंत्रणांना बुधवारी संस्थात्मक विलगीकरणासंदर्भात बैठकीत दिले.
संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. झोन अंतर्गत चाचण्या वाढविण्यात याव्या. यासंदर्भात सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे. सुपर स्प्रेडरला तपासणीकरिता सूचित करावे. झोन स्तरावर कंटेनमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. विवाह समारंभात उपस्थिती मर्यादा व मास्क वापरणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर इनकॅमेरा दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. 
 उपायुक्त सुरेश पाटील, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, भाग्यश्री बोरकर, नगर सचिव मदन तांबेकर, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, पशू शल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, उदय चव्हाण, श्यामकांत टोपरे, डॉ. अजय जाधव, डॉ. मानसी मुरके उपस्थित होते.

विमवि क्वारंटाईन सेंटरचे काम सुरू
विमवि क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. बांधकाम व प्रकाश विभागाने संयुक्त पाहणी करून ते सेंटर त्वरित सुरू करण्याचे निर्देश आयुक्त रोडे यांनी दिले. सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेऊन तशी माहिती विभागप्रमुखाला द्यावी व विभागप्रमुखांनी आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

 

Web Title: -Now house separation is prohibited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.