आनंदराव अडसुळांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:23 PM2018-07-02T14:23:38+5:302018-07-02T14:25:10+5:30

नवनीत राणा विरुद्ध खासदार आनंदराव अडसूळ प्रकरणात प्रथमच गैरअर्जदारांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस बजावण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यानुसार खा. आनंदराव अडसूळ यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे.

Notice to Anandrao Adsul by whats-app | आनंदराव अडसुळांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस

आनंदराव अडसुळांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस

Next
ठळक मुद्देन्यायालयाकडून पहिल्यांदाच परवानगीअ‍ॅड. परवेज खान यांनी केला अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवनीत राणा विरुद्ध खासदार आनंदराव अडसूळ प्रकरणात प्रथमच गैरअर्जदारांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस बजावण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यानुसार खा. आनंदराव अडसूळ यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे. यासंदर्भात राणा यांचे वकील परवेज खान यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अमरावतीच्या न्यायवर्तुळातील ही पहिलीच घटना आहे.
विधी सूत्रानुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे नवनीत राणा यांनी खा. आनंदराव अडसुळांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीवरून खा. अडसुळांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, काही कालावधीनंतर हे प्रकरण रद्दबातल ठरविण्यात आले. याविषयी नवनीत कौर राणा यांनी ४ जून रोजी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान मागील तारखेवर गैरअर्जदार प्रकाश मंजलवार हजर झाले होते, तर खासदार आनंदराव अडसूळ व नितीन तारेकर यांना नोटीस मिळाली नसल्याचा अभिप्राय गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात दाखल केला होता. नवनीत कौर राणा यांचे वकील परवेज खान यांनी आनंदराव अडसूळ व नितीन तारेकर यांच्यावर पुन्हा नोटीस काढण्याकरिता न्यायालयात अर्ज केला. सदर प्रकरणात २९ जून रोजी नितीन तारेकरसुद्धा हजर झाले. परंतु, खा. आनंदराव अडसूळ यांच्याबद्दलचा अहवाल पोलिसांकडून दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे राणा यांचे वकील परवेज खान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ११ जून रोजीच्या न्यायनिर्णयाचा दाखला देत जिल्हा व सत्र न्यायधीश (५) विमलनाथ तिवारी यांना खा. अडसुळांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी मागितली. त्यांचे सहकारी वकील चंद्रसेन गुळसुंदरे यांच्या मोबाइलद्वारे नोटीस बजावण्याची विनंती केली. खासदार अडसुळांना पोलीस नोटीस तामिल करू शकत नाहीत, ही बाब लक्षात घेता त्यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस देने आवश्यक असल्याचे अ‍ॅड. परवेज खान यांनी अर्जामध्ये नमूद केले. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करून व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी दिली. त्यानंतर तात्काळ खा. अडसूळ यांना नोटीस पाठविण्यात आली. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १३ जुलै ही तारीख दिली आहे. या प्रकरणात वकील परवेज खान यांना वकील चंद्रसेन गुळसुंदरे व वकील पराग ठाकरे सहकार्य करीत आहेत.

Web Title: Notice to Anandrao Adsul by whats-app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.