प्रिंटरविना पासबुकमध्ये एन्ट्री मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:31+5:302021-05-07T04:14:31+5:30

टाकरखेडा संभू : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रिंटर नादुरुस्त असल्याने एक महिन्यांपासून खातेदारांना त्यांच्या पासबुकात त्यांच्या बँकींग व्यवहाराची ...

No entry in passbook without printer | प्रिंटरविना पासबुकमध्ये एन्ट्री मिळेना

प्रिंटरविना पासबुकमध्ये एन्ट्री मिळेना

Next

टाकरखेडा संभू : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रिंटर नादुरुस्त असल्याने एक महिन्यांपासून खातेदारांना त्यांच्या पासबुकात त्यांच्या बँकींग व्यवहाराची एन्ट्री मिळत नसल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. प्रिंटर कधी दुरुस्त होणार या प्रतीक्षेत आता येथील ग्राहक आहे.

टाकरखेडा संभू येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असून साऊर, कळमगव्हाण, जळका हिरापूर, रामा, देवरी निपाणी आदी गावातील खातेदारांची खाती आहेत. पाच ते सहा किलोमीटरवरून उन्हातान्हात येथील खातेदार या बँकेमध्ये येतात, पैसे जमा करतात अथवा बँकेचा इतर व्यवहार करतात. परंतु या बँके मधून खातेदारांना पासबुकमध्ये एन्ट्री मिळत नाही. सदर प्रिंटर दुरुस्तीकरिता अमरावती येथील बँकेच्या मुख्य शाखेत पाठविण्यात आले आहे ,लॉकडॉऊनमुळे या प्रिंटर मधील पार्टस मिळत नसल्याने अद्यापही नादुरुस्त असल्याचे मुख्य शाखेकडून देखील सांगण्यात आले आहे.

Web Title: No entry in passbook without printer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.