नांदगावात सर्वाधिक सोयाबीन गारद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:16+5:30

जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तुलनेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यातील ३५  हजार २६९  हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन,  ३ हजार २७०  हेक्टरवरील कापूस,  २१५  हेक्टरवरील उडीद व २८८  हेक्टरवरील मूग असे एकूण ३९  हजार ४९२  हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले. त्यानुसार जिल्ह्यात या कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ९१ हजार ५८४  हेक्टर ९७ आर क्षेत्र बाधित झाले

Nandgaon has the highest soybean crop | नांदगावात सर्वाधिक सोयाबीन गारद 

नांदगावात सर्वाधिक सोयाबीन गारद 

Next
ठळक मुद्दे३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान : जिल्ह्यातील अतिवृष्टीचे नुकसान २१४ कोटींहून अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क 
नांदगाव खंडेश्वर : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पारंपरिक पिके व फळपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी २१४ कोटी ३६ लाख ९२  हजार २५० रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे. 
जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तुलनेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यातील ३५  हजार २६९  हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन,  ३ हजार २७०  हेक्टरवरील कापूस,  २१५  हेक्टरवरील उडीद व २८८  हेक्टरवरील मूग असे एकूण ३९  हजार ४९२  हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले. त्यानुसार जिल्ह्यात या कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ९१ हजार ५८४  हेक्टर ९७ आर क्षेत्र बाधित झाले. त्यात जिरायत पिकाखालील क्षेत्र २ लाख ७७ हजार १७० हेक्टर, बागायतीखालील क्षेत्र ११७. ६२ हेक्टर व फळपीकाखालील क्षेत्र १४ हजार २९७ हेक्टर आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख २२ हजार ५९६ आहे. भरपाईसाठी २१४ कोटी ३६ लाख रुपये निधीची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली.  जिरायतीत सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीन नुकसानाचा सर्वाधिक फटका नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसला आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यात केळीचे नुकसान 
अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ टक्क्यांहून अधिक हानी झालेल्या बागायती क्षेत्रात केळी पीकाखाली ११३  हेक्टर ६२ आरवरील केळी, १.४५ हे. भाजीपाला व २.५५ हेक्टरवरील उसाचे असे एकूण ११७.६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

बहुवार्षिक फळपिकांमध्ये संत्र्याचे नुकसान
बहुवार्षिक फळपिकांच्या बाधित क्षेत्रात वरूड तालुक्यात १४ हजार ६२ हेक्टर संत्रा, मोर्शी तालुक्यात १९९.५० हेक्टर मोसंबी, नांदगाव खंडेश्वरमध्ये ३५ हेक्टरवरील  संत्राबागा बाधित झाल्या.

Web Title: Nandgaon has the highest soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती