VIDEO : खासदार नवनीत राणा यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:05 PM2022-12-04T16:05:11+5:302022-12-04T16:11:23+5:30

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही आपली जोरदार फटकेबाजी केली. 

MP Navneet Rana hit in cricket ground, amravati | VIDEO : खासदार नवनीत राणा यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी...

VIDEO : खासदार नवनीत राणा यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी...

googlenewsNext

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि ठाकरे गटात विस्तवही जात नाही. राजकारणात नेहमी ठाकरे गटावर व उद्धव ठाकरेंवर टीकेची फटकेबाजी करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही आपली जोरदार फटकेबाजी केली. 

रविवारी अमरावती शहरात असलेल्या वेलनेस सेंटरच्या उटघाटनासाठी खासदार नवनीत राणा दाखल झाल्या होत्या. याच ठिकाणी अंबिका नगरमध्ये काही तरुण क्रिकेट खेळत होते. यादरम्यान खासदार नवनीत राणा यांचे लक्ष क्रिकेट खेळत असलेल्या मुलांकडे गेले. यानंतर खासदार नवनीत राणांनीही त्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरूवात केली. यावेळी त्यांनी शानदार फलंदाजी केली.


दरम्यान, नवनीत राणा आणि ठाकरे गटात विस्तवही जात नाही. संधी मिळताच नवनीत राणांकडून ठाकरे गटाला घेरण्याचं काम सुरु होते. मात्र, चार दिवसांपूर्वी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाचे समर्थन नवनीत राणा यांनी केले. चार दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महिलेला बसवायचं आहे, अशी घोषणा शिवशक्ती-भीमशक्तीच्या मेळाव्यात केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचे स्वागत खासदार नवनीत राणा यांनीही केले आहे. 

दुसरीकडे, नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधात हनुमान चालिसा प्रकरणी वॉरंट निघाले आहे. या वॉरंटनुसार १४ तारखेपर्यंत राणा दांपत्याला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून राणांविरोधात हा वॉरंट जारी झाला आहे.

Web Title: MP Navneet Rana hit in cricket ground, amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.