लाखोंची रोख हजारात दाखवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:32+5:30

१३ आरोपींना जामिनावर सोडण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थाची भूमिका बजावली. शुक्रवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान सर्व आरोपींना सोडून दिल्याची माहिती आहे. जुगारात पकडण्यात आलेल्या व स्वत:ला एका माजी मंत्र्यांचा आतेभाऊ मामेभाऊ संबोधणाऱ्या व्यक्तीमुळे प्रकरण जागेवर निपटले नाही. अन्यथा जुगाराची अनेक प्रकरणे जागीच निपटविली जातात, असा पूर्वानुभव आहे.

Millions of rupees in cash! | लाखोंची रोख हजारात दाखवली !

लाखोंची रोख हजारात दाखवली !

Next
ठळक मुद्देहाय प्रोफाईल जुगाराच्या मागचे सत्य वेगळेच : वरिष्ठ अधिकारी घेणार का दखल?

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : दर्यापूर अंजनगाव मार्गावरील एका बारमध्ये जुगार खेळताना १३ नागरिकांना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १९ जूनच्या रात्री अटक केली. यात येथील नगरसेवक, खरेदी विक्री संघाचा संचालक, वकील व अन्य लब्धप्रतिष्ठितांचा समावेश होता. पोलिसांनी घातलेल्या धाडीत जप्त केलेली रक्कम लाखांच्या घरात असताना, ती हजारांत दाखविल्याचा आरोप केला जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांच्या चमुने ही धाड टाकली. काही प्रत्यक्षदर्शीनुसार, तेथे पाच ते सहा नागरिक जुगार खेळत होते. उर्वरित त्यातील एका आरोपीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जेवण करण्यासाठी उपस्थित होते.
टेबलवर जेवणाची वाट पाहत होते. त्यांनासुद्धा पोलिसांनी आरोपी केल्याची ओरड आहे. तसेच चारचाकी वाहने दाखवून जप्ती ४५ लाख रुपये दाखविली. अंजनगाव सुर्जी तालुक्यात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

आरोपींनी मोजली रक्कम ?
१३ आरोपींना जामिनावर सोडण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थाची भूमिका बजावली. शुक्रवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान सर्व आरोपींना सोडून दिल्याची माहिती आहे. जुगारात पकडण्यात आलेल्या व स्वत:ला एका माजी मंत्र्यांचा आतेभाऊ मामेभाऊ संबोधणाऱ्या व्यक्तीमुळे प्रकरण जागेवर निपटले नाही. अन्यथा जुगाराची अनेक प्रकरणे जागीच निपटविली जातात, असा पूर्वानुभव आहे.

ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. त्यावेळी तेथे व्हिडीओ शूटिंग घेतली होती. त्यामुळे लाखोंचा ऐवज हजारांत दाखविण्याचा प्रश्नच येत नाही.
- राजेश राठोड,
ठाणेदार, अंजनगाव सुर्जी

Web Title: Millions of rupees in cash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस