Maharashtra Election 2019 ; रॅलीद्वारे सुनील देशमुख यांचे शहरात शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:52+5:30

आझाद हिंद चौकातून सुरू झालेली ही रॅली बुधवारा परिसरातील हरिभाऊ कलोती स्मारकापासून माताखिडकी, अण्णाभाऊ साठे स्मारक, नीळकंठ मंडळ, खडकारीपुरा, माळीपुरा, भाजीबाजार, तारखेडा, दहिसार आदी परिसरात गेली. यावेळी सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत तसेच शहराच्या विकासाचा प्रवाह असाच कायम ठेवण्याचे अभिवचन दिले.

Maharashtra Election 2019 ; Sunil Deshmukh demonstrates power in the city by rally | Maharashtra Election 2019 ; रॅलीद्वारे सुनील देशमुख यांचे शहरात शक्तीप्रदर्शन

Maharashtra Election 2019 ; रॅलीद्वारे सुनील देशमुख यांचे शहरात शक्तीप्रदर्शन

Next
ठळक मुद्देनागरिकांशी संवाद : विकासकामांचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या शहराचा भाग असलेला जवाहर गेट व बुधवारा परिसरात महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांची विजय संकल्प रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. रविवार दिवस असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.
आझाद हिंद चौकातून सुरू झालेली ही रॅली बुधवारा परिसरातील हरिभाऊ कलोती स्मारकापासून माताखिडकी, अण्णाभाऊ साठे स्मारक, नीळकंठ मंडळ, खडकारीपुरा, माळीपुरा, भाजीबाजार, तारखेडा, दहिसार आदी परिसरात गेली. यावेळी सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत तसेच शहराच्या विकासाचा प्रवाह असाच कायम ठेवण्याचे अभिवचन दिले.
यावेळी माजी खासदार अनंत गुढे, महापौर संजय नरवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, भाजपा शहराध्यक्ष जयंत डेहनकर, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, प्रवीण हरमकर, प्रदीप वडनेरे, प्रा.रवी खांडेकर, विवेक कलोती, गोविंद दायमा, संजय बुरंगे, तिवारी, गोयनका, संजय तिरथकर, राजाभाऊ खारकर, गजानन रडके, अविनाश देऊळकर आदींसह महायुतीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Sunil Deshmukh demonstrates power in the city by rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.