Maharashtra Election 2019 : विकासकामांना साथ द्यानवनीत राणा यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:16 AM2019-10-15T01:16:21+5:302019-10-15T01:16:46+5:30

बडनेरा मतदारसंघातील महाआघाडी, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी ग्रामीण भागात काढलेल्या जनसंवाद यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार रवि राणा यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra Election 2019 : Rana appealed for support to development works | Maharashtra Election 2019 : विकासकामांना साथ द्यानवनीत राणा यांचे आवाहन

Maharashtra Election 2019 : विकासकामांना साथ द्यानवनीत राणा यांचे आवाहन

Next
ठळक मुद्देमतदारांशी संवाद : बडनेरा मतदारसंघात संपर्क अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा मतदारसंघातील महाआघाडी, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी ग्रामीण भागात काढलेल्या जनसंवाद यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार रवि राणा यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
चांदुरी, लोणटेक, मलकापूर, पांढरी, कवठा बहाळे, निंभोरा, गणोरी, दाढी-पेढी, गणोजा देवी, चाकूर येथे जनसंवाद यात्रेला ग्रामीण मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. रवि राणा यांनी बडनेरा मतदारसंघाचा १० वर्षात केलेला विकास हा गत ४० वर्षांतही झाला नाही, असा दावा खा. राणा यांनी केला. निवडणुकीपुरते राजकारण नव्हे, विकासाचे समाजकारण सतत करीत आले असल्याचे व रवि राणा यांची उमेदवारी ही सर्वधर्मीय असल्याचे त्या म्हणाल्या. गाव-खेड्यात विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात प्रत्येक मतदाराला रवि राणा आपलेसे वाटतात, असे खा. राणा म्हणाल्या. मलकापूर, कवठा बहाळे, गणोरी, दाढी पेढी येथील जाहीर सभेत खा. राणा यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, पुरुष, ज्येष्ठांना पुन्हा विकासासाठी रवि राणा यांना संधी देण्याचे आवाहन केले. ग्रामीण मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी खा. राणा यांनी गावागावांत पदयात्रा काढली.

Web Title: Maharashtra Election 2019 : Rana appealed for support to development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.