अन् ती भीक मागून भरते पोटाची खळगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:29+5:30

हातावर कमावून कुटुंबाचे पालन पोषण करणारे साहेबराव इंगळे शहापूर पुनर्वसनमध्ये झोपडी वजा घरात २० वर्षीय सीता आणि १२ वर्षीय आकाश या मुलासोबत पत्नी शशिकलासोबत राहतात. पत्नीला डोळ्याचा आजार झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान ती अंध झाली. मुलगा आणि मुलगीसुद्धा जन्मत:च अंध असल्याने संसाराचा गाडा साहेबराव इंगळेंवर होता. भूमिहीन असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह ते भागवित होते.

The last beggar fills his stomach | अन् ती भीक मागून भरते पोटाची खळगी

अन् ती भीक मागून भरते पोटाची खळगी

googlenewsNext
ठळक मुद्देमुला-मुलींसह माताही आंधळी, पती अपंग : शहापूरच्या इंगळे परिवाराची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : गरिबीचे जीणे जगत असताना अचानक नियतीचा फेरा पालटला अन् मातेसह दोन अपत्यही अंध झाली. कुटुंबातील कर्ता पुरुष मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवित होता. परंतु अपघातात तोही दोन्ही पायांनी अपंग झाला. पत्नीपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न निर्माण झाल्यामुळे दोन अंध अपत्यांसह अंध मातेवर शहरात भीक मागून दोन वेळची भूक भागविण्याची वेळ आली आहे.
हातावर कमावून कुटुंबाचे पालन पोषण करणारे साहेबराव इंगळे शहापूर पुनर्वसनमध्ये झोपडी वजा घरात २० वर्षीय सीता आणि १२ वर्षीय आकाश या मुलासोबत पत्नी शशिकलासोबत राहतात. पत्नीला डोळ्याचा आजार झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान ती अंध झाली. मुलगा आणि मुलगीसुद्धा जन्मत:च अंध असल्याने संसाराचा गाडा साहेबराव इंगळेंवर होता. भूमिहीन असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह ते भागवित होते. दोन वर्षांपूर्वी एका भाजी विक्रेत्याकडे कामावर असताना राजुरा बाजार ते शहापूर पायी प्रवासात दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केले. यात कायमचे अपंगत्व आल्याने कुटुंबावर उपासमार आली. परंतु अंध पत्नी शशिकला हिने धीर न सोडता दोन अपत्यांना गावातीलच शाळेत टाकले. परंतु अंध असल्याने शिक्षकांच्या मदतीने मुलीने ७ वी, तर मुलाने पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. वडिलांच्या अपंगत्वामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आईसह दोन्ही अंध मुलांनी भीक मागून दिवसभरात जमलेल्या ५० ते १०० रुपयांमध्ये दोनवेळेची सांज भागविणे सुरू केले. साधा रास्ता ओलांडणेही त्यांना अशक्य असताना जीवावर बेतणारी भ्रमंती करून आईचा हात धरून ती मुले पैसे गोळा करतात. परंतु या अंध मायलेकांना दृष्टी येणे गरजेचे असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधीने लक्ष देऊन सहकार्य केल्यास या परिवाराची फरफट थांबून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होऊ शकेल, अशी सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मरणयातना भोगून उपजीविका चालविणारे इंगळे नामक भूमिहीन कुटुंब शहापूर येथील आहे.

सामाजिक बांधीलकी
कु ठल्यातरी रूग्णालयात जाऊन रूग्णांना एक केळं देऊन फोटोसेशन केले जाते. सामाजिक कार्याचे अवडंबर केले जाते. मात्र, इंगळे कुटूंब दररोज दिसत असताना, त्यांना कुठलिही मदत केली जात नाही. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते जातात, तरी कु ठे? असा सवाल वरूडकरांमधून विचारला जात आहे.
 

Web Title: The last beggar fills his stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.