लालपरी धावली, मात्र प्रवाशाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:02+5:30

लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्याने यातील ३ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

Lalpari ran, but without the passenger | लालपरी धावली, मात्र प्रवाशाविना

लालपरी धावली, मात्र प्रवाशाविना

Next
ठळक मुद्देमोर्शी आगारातून तीन बसफेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : मार्च महिन्यापासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शुक्रवारी काही अटीवर सुरू करण्यात आल्या. परंतु प्रवासीच नसल्याने सकाळच्या सत्रात काही शेड्युल रद्द, तर एका फेरीविना प्रवास करावा लागल्याचा प्रसंग मोर्शी आगारावर ओढावला.
लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्याने यातील ३ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. एक फेरी ज्या रस्त्याने अधिक प्रवासी असतात आशा चांदूर बाजार - परतवाडा मार्गावरील रिद्धपूर या गावाकरिता सोडण्यात आली, परंतु, या बसमध्येसुद्धा एकही प्रवासी नसल्याचे दिसून आले. मोर्शी आगारातून नऊ शेड्यूल सोडण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकाने घेतला होता. त्यापैकी चार शेड्यूल सकाळच्या सत्रात व पाच शेड्यूल दुपारच्या सत्रात सोडण्यात येणार होत्या. परंतु पहिल्याच सत्रात तीन बसेस रद्द करण्यात आल्याने उर्वरित शेड्यूलसुद्धा पूर्णत्वास जाईल की नाही, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. नियमित वेळेत मोर्शी आगारातून २८३ फेड़्या केल्या जातात. परंतु लॉकडाऊनचा काळ पाहता मोर्शी आगारातून फक्त नऊ शेड्यूल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले. याकरिता पहाटे आगारात गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंग रहावे, याकरिता फक्त दहा कर्मचारी कर्तव्यावर बोलाविण्यात आले होते. आगारातून बस नेताना वाहकाकडे सॅनिटायझर व मास्क दिले जातात. त्याचबरोबर प्रत्येक सीटवर एकच प्रवासी बसेल याची दक्षतासुद्धा घेण्याचे सांगितले आहे. बसमध्ये किमान २० प्रवासी असणे आवश्यक असून, ६५ वर्षांवरील नागरिक तसेच १० वर्षांच्या आतील मुलांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याने निवडक प्रवासी संख्या कमी राहिली.

Web Title: Lalpari ran, but without the passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.