केकतपूरवासी पोहचले एसपी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:40+5:30

मारहाणीनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून गैरअर्जदारांनीच मंदिरातील मूर्तीची विटबंना करून खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी अमितची आई चंदाबाई भुजाडे यांनी केली. पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा नोंदविण्याची कैफियत विजया खुरसडे यांनी एसपींकडे मांडली. असंख्य केकतपूरवासी एकत्र आल्याने एसपी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.

Kekatpur residents reached the SP office | केकतपूरवासी पोहचले एसपी कार्यालयात

केकतपूरवासी पोहचले एसपी कार्यालयात

googlenewsNext
ठळक मुद्देपुन्हा चौकशीची मागणी : मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुठलाही दोष नसताना माहुली जहागीर पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. तो गुन्हा मागे घ्यावा, राजेंद्र खुरसडे यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा व या प्रकरणाची एसपींनी पुन्हा चौकशी करावी या मागणीकरिता केकतपूरचे असंख्य लोक गुरुवारी सकाळी ११ वाजता एसपी कार्यालयात पोहचले. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांना निवेदन त्यांनी सादर केले.
केकतपूर येथील बुद्ध समाज मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविल्याची व खुरसडे यांना मारून गंभीर जखमी केल्याची घटना ३ ऑगस्टच्या रात्री घडली.
मारहाणीनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून गैरअर्जदारांनीच मंदिरातील मूर्तीची विटबंना करून खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी अमितची आई चंदाबाई भुजाडे यांनी केली. पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा नोंदविण्याची कैफियत विजया खुरसडे यांनी एसपींकडे मांडली. असंख्य केकतपूरवासी एकत्र आल्याने एसपी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.
पत्नीची तक्रार
जखमीचा मुलगा अर्जदार प्रणय खुरसडे, याने एसपींना तक्रारीचे निवेदन दिले यामध्ये गैरअर्जदार सुरेश प्रल्हादराव गायकवाड, नरेश प्रल्हादराव गायकवाड, प्रशांत अशोकराव कांबळे, गजानन कांबळे, धम्मदास तायडे, मनोज कांबळे, हर्षू कांबळे, विशाल वरघट, चेतन कांबळे, सचिन कांबळे, आशिष तायडे (सर्व रा. केकतपूर) यांनी राजू खुरसडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदविली आहे.

दोन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका प्रकरणात गुन्हा नोंदविलेला आहे. राजेंद्र खुरसडे यांना मारहाण प्रकरणात १० जणांवर भादंविचे कलम ३०७, ३४ अन्वये गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे.
- हरिबालाजी एन.
जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Kekatpur residents reached the SP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस