मोर्शी, वरुड तालुक्यांत १२३ हेक्टरवर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:13+5:30

रवाळा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. हा बंधारा चुडामन नदीवर होणार असून, त्यात १२७ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल. याद्वारे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. मौजे कोपरा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७७ लाख रुपये खर्च होतील. हा बंधारा पाक नाल्यावर होणार आहे.

Irrigation on 123 hectares in Morshi, Varud talukas | मोर्शी, वरुड तालुक्यांत १२३ हेक्टरवर सिंचन

मोर्शी, वरुड तालुक्यांत १२३ हेक्टरवर सिंचन

Next
ठळक मुद्देतीन कोटींचा खर्च : चार ठिकाणी होणार उभारणी, आमदारांच्या हस्ते बंधाऱ्यांची पायाभरणी

मोर्शी : वरूड, मोर्शी तालुक्यांत तीन कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते रविवारी विविध कोल्हापुरी बंधाºयांची पायाभरणी करण्यात आली.
रवाळा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. हा बंधारा चुडामन नदीवर होणार असून, त्यात १२७ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल. याद्वारे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. मौजे कोपरा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७७ लाख रुपये खर्च होतील. हा बंधारा पाक नाल्यावर होणार आहे. मोर्शी येथे ५५ लाख रुपये तसेच अहमदपूर येथे एक कोटी रुपयांतून बंधाºयाची निर्मिती होईल. एकूण १२३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नगराध्यक्ष मेघना मडघे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील व अनिल डबरासे, मोहन मडघे, नरेंद्र जिचकार, पंचायत समिती उपसभापती चंदू अळसपुरे, सरपंच आम्रपाली भाजीखाये, अशोक देवते, अरविंद भागवतकर, भूषण चौधरी, विनू शहा, नामदेव आहाके, प्रभाकर काळे, आशु अढाऊ, रवी वंजारी, हितेश साबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आहाके यावेळी उपस्थित होते.

Web Title: Irrigation on 123 hectares in Morshi, Varud talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.