अवैध विद्युत जोडणी जिवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:38 AM2019-08-17T01:38:03+5:302019-08-17T01:38:31+5:30

रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्युत प्रवाह घेण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

Invalid electrical connection dead | अवैध विद्युत जोडणी जिवावर बेतली

अवैध विद्युत जोडणी जिवावर बेतली

googlenewsNext
ठळक मुद्देहिरदामल येथील घटना : टेम्ब्रूसोंडा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा घरी मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्युत प्रवाह घेण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
दुर्गा गजानन जामकर (१७) असे मृताचे नाव आहे. १४ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सुट्टी घेऊन ती घरी आली होती. सायंकाळी घराकडून गेलेल्या विद्युत खांबावरील जिवंत विद्युत तारांमध्ये आकोडे टाकून घरात नेहमीप्रमाणे वीरपुरवठा घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यात तिला जोराचा धक्का लागल्याने ती कोसळली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आला.
१५ आॅगस्ट रोजी दुपारी तीन वाजता तिच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार लिल्हारे, आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आर.जी. काळे, अधीक्षक पी.डब्ल्यू. देसाई, शिक्षक वाय.एस. गणोरकर, डी.व्ही. देशमुख यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
दरम्यान, मेंदी सुकविण्यसाठी कूलर लावत असताना तिचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.

महावितरणचे कर्मचारी बेपत्ता
मेळघाटात खांबावरून घरोघरी वीजप्रवाह घेतला जात असल्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. या आदिवासी खेड्यांमधून महावितरणचे कर्मचारी हप्ताखोरी करीत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुढे आली आहे. यामुळेच बिनबोभाट आकोडे टाकून घरोघरी वीजपुरवठा घेत्ला जातो. त्याचा फटका एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतला. हे सर्व अवैध कनेक्शन काढण्याचे आदेश महावितरणला प्रकल्प कार्यालयाने दिले. दुसरीकडे सदर विद्यार्थिनीला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्याध्यापकाने सुटी कशी दिली, असा सवाल गावकऱ्यांसह पालक वर्गाने केला आहे.

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे मृत्यू
अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख अध्यक्ष असलेल्या पीपल्स वेलफेअर सोसायटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या दत्तप्रभू अनुदानित आश्रमशाळेत गत आठवड्यात इयत्ता सातवीत शिकणाºया शिशुपाल बेलसरे या विद्याथ्यार्चा मृत्यू झाला. संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना या आश्रमशाळेत सुविधा न देता लाखोंचे अनुदान लाटत असल्याचा प्रकार चौकशीत पुढे आला. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Invalid electrical connection dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.