कोरोना प्रतिबंधासाठी राबताहेत शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:17+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग मुख्यत: नाक व तोंडावाटे शरीरात प्रवेशाने होतो. विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून नाक व तोंडाला मास्क लावून प्रतिबंध करणे महत्त्वपूर्ण ठरते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध संस्था, गटांना आवाहन केले. त्याला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळून लक्षावधी मास्कची निर्मिती करण्यात आली.

Hundreds of hands are working for the corona ban | कोरोना प्रतिबंधासाठी राबताहेत शेकडो हात

कोरोना प्रतिबंधासाठी राबताहेत शेकडो हात

Next
ठळक मुद्देमास्कचे सुरक्षाकवच ठेवेल कोरोनापासून दूर : सुरक्षा पोशाख, बेडची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाने जगापुढे नवे संकट उभे केले असताना त्यावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना समाजातील विविध स्तरांतून साथ मिळत आहे. सर्वदूरच्या महिला बचत गट ते कारागृहातील बंदीजन यांचेही योगदान लक्षणीय ठरले. या माध्यमातून दोन लाखांहून अधिक मास्क निर्मिती, विलगीकरण कक्षासाठी खाटा अशा अनेक उपयुक्त साहित्य व वस्तूंची निर्मिती होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग मुख्यत: नाक व तोंडावाटे शरीरात प्रवेशाने होतो. विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून नाक व तोंडाला मास्क लावून प्रतिबंध करणे महत्त्वपूर्ण ठरते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध संस्था, गटांना आवाहन केले. त्याला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळून लक्षावधी मास्कची निर्मिती करण्यात आली. स्थानिक प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून सुती कापड तयार करण्याचे काम कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून केले जाते. त्यांच्याकडून तयार मास्क दुपदरी सुती कापडाचे मास्क स्वच्छ करून पुन्हा वापररता येतात. स्वयंस्फूतीर्नेही अनेक गट यात सहभागी झाले असून, रोजगारही उपलब्ध होत आहे.

बंदीजनांकडून ७५ हजार मास्क
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या माध्यमातून मास्कनिर्मितीला गती आली आहे. बंदीजनांकडून आतापर्यंत सुमारे ७५ हजार मास्क तयार केले आहेत. कारागृहात अनेक बंदीजन कुशल कारागीर आहेत. रुग्णांसाठी खाटा तयार करण्याची जबाबदारीही बंदीजनांना दिली आहे. कोविड रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी येथील विलगीकरण कक्ष, मोझरी येथील कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी या खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. दीडशे खाटांची निर्मिती आतापर्यंत झाल्याचे अधीक्षक रमेश कांबळे म्हणाले.

१३ महिला बचत गट
महिला भगिणींनी काळाची गरज ओळखून केवळ मास्कनिर्मितीवरच न थांबता सुरक्षा ड्रेसही तयार केले आहेत. दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय उपजिवीका अभियानांतर्गत अमरावतीतील १३ महिला बचतगटांचा समूह अमरावती महापालिकेसाठी मास्क बनविण्याचे काम करीत आहे. बचतगटातील महिला स्वत:च्या घरीच मास्क तयार करण्याचे काम करतात. मास्क बनविण्यासाठी लागणारा कापड खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उपलब्ध करून दिला आहे. जीव धोक्यात घालून काम करणाºया आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार व इतरांना हे मास्क पुरविण्यात येत आहेत.

 

Web Title: Hundreds of hands are working for the corona ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.