ज्या ठाण्यात कार्यरत, तेथेच झाली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 05:00 AM2021-09-27T05:00:00+5:302021-09-27T05:00:55+5:30

अनेक गुन्हेगारांना अटक करणारा लेवटकर हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला अटक करताना गाडगेनगर पोलिसांनादेखील काही वेळेसाठी कसेनुसे झाले. आधी ३० हजार रुपये व आणखी २० हजार रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मूळ खरेदीखताची प्रत देण्यासाठी लेवटकरने ती लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले.

He was arrested at the same station where he was working | ज्या ठाण्यात कार्यरत, तेथेच झाली अटक

ज्या ठाण्यात कार्यरत, तेथेच झाली अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात स्वत:विरुद्ध गुन्हा नोंदविला गेल्यानंतर तेथेच अटक होण्याची नामुष्की लाचखोर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकरवर ओढविली. 
अनेक गुन्हेगारांना अटक करणारा लेवटकर हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला अटक करताना गाडगेनगर पोलिसांनादेखील काही वेळेसाठी कसेनुसे झाले. आधी ३० हजार रुपये व आणखी २० हजार रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मूळ खरेदीखताची प्रत देण्यासाठी लेवटकरने ती लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले. कठोरा रोडवरील उर्वशीनगरातील निवृत्त व्यक्तीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी लेवटकर व रोहन भोपळे या खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. गाडगेनगर ठाण्यातील ड्युटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक खंडारे यांनी आपल्याच ठाण्यात कार्यरत सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लेवटकरने २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१९ ते ३.४३ या कालावधीत गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारली.

घरी आढळले पाच तोळे सोने
पीएसआय लेवटकरला रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. घरी पाच तोळे सोने आढळून आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने लेवटकरच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची,  दस्तावेजांची शहानिशा होणार असल्याची माहिती अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

लाचखोरांची विभागीय चौकशी
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या कार्यालयाची तपासणी करण्यात येणार आहे. अशा अधिकाऱ्यांचे कार्यालयीन वर्तन, हाताळलेली प्रकरणे, गोपनीय अहवालातील प्रतिकूल नोंदी असल्यास त्यांची विभागीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने सन २०१८ मध्येच दिले आहेत.

निलंबनाची कारवाई 
लाचखोरीप्रकरणी एसीबीकडून पकडल्या गेल्यानंतर लेवटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शनिवारी त्याबाबतचे आदेश काढले. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

Web Title: He was arrested at the same station where he was working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.