शहरातील पानटपऱ्यांवर गुटख्याची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:01:02+5:30

अनलॉकमध्ये अनेक किरकोळ व्यावसायिकांनी परवानगी नसतानाही धाडस करून पानटपऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी, गुटख्याच्या घातक अशा पुड्या, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यवसाधीन होत असून त्यांना कर्करोगसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहेत.

Gutkha is widely sold in the city | शहरातील पानटपऱ्यांवर गुटख्याची सर्रास विक्री

शहरातील पानटपऱ्यांवर गुटख्याची सर्रास विक्री

Next
ठळक मुद्दे‘मागेल त्यांना गुटखा’: अन्न सुरक्षा मानके कायद्याची पायमल्ली, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

असे केले ‘स्टिंग’
‘लोकमत’ची चमू कार्यालयातून १.१५ वाजता अमरावती मध्यवर्ती आगारानजीक एफडीएच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील असलेल्या पानटपरीवर पोहचली. त्याठिकाणी गुटखा विक्रेत्याकडून दोन वेगवेगळ्या कंपनीच्या ३० रुपयांच्या आठ गुटख्याच्या पुड्या विकत घेण्यात आल्या. तेथे आलेल्या काही ग्राहकांनासुद्धा सहज गुटखा उपलब्ध झाला. त्यानंतर पंचवटी चौकातील ‘लवाद न्यायालया’च्या बाजूलाच असलेल्या पानटपरींवरसुद्धा राजरोसपणे गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ३० रुपयांच्या गुटखा पुड्या विकत घेण्यात आल्या. त्यानंतर चमू इर्विन चौकात पोहोचली. तेथील एका पानटपरीवरून दोन वेगवेगळ्या कंपनीच्या पुड्या व शरीराला घातक असा सुगंधी तंबाखूसह एकूण ४० रुपयांचा गुटखा विकत घेण्यात आला. तीन ठिकाणांवरून प्रतिनिधीने १०० रुपयांचा गुटखा विकत घेतला. पानटपरीचालकाच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती दिसून येत नव्हती. ते बिनधास्तपणे गुटख्याची विक्री करीत होते.

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानके कायदा’ पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरींवर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असल्याचे वास्तव रविवारी दुपारी ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशनमध्ये’ पुढे आले आहे.
शहरात प्रत्येक पानटपरींवर राजरोजसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना एफडीए अधिकाऱ्यांचा आर्शिवाद तर नाही ना? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊनमध्ये पानटपऱ्या बंद होत्या तरीही छुप्या मार्गाने शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच होती. मात्र, अनलॉकमध्ये अनेक किरकोळ व्यावसायिकांनी परवानगी नसतानाही धाडस करून पानटपऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी, गुटख्याच्या घातक अशा पुड्या, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यवसाधीन होत असून त्यांना कर्करोगसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहेत. त्याकारणानेच शासनाने आठ वर्षापुर्वी राज्यात गुटखा बंदी आणली. तरीही मध्यप्रदेशातून शहरात गुटखा दाखल होतो. येथील गुटखा तस्करांकडून पानटपरींवर तो पोहचतो व शहरात प्रत्येक पानटपरींवर ‘मागेल त्यांना गुटखा’ मिळत असल्याचे ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तीन वेगवेळ्या चौकात जावून लोकमच्या चमुने १०० रुपयाचा गुटखा विकत घेतला.
विशेष म्हणजे अमरावती मध्यवर्ती आगाराच्या बाजुला अन्न व औषधी प्रशासन विभाग (एफडीए)चे कार्यालय आहे. त्याच्या समोरच एका पानटपरीवर एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चवून अवैधरीत्या गुटखा विक्री होत असताना याकडे अधिकाºयांनी मात्र, या प्रकाराकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे.

अधिकाऱ्यांची तोंडदेखली कारवाई
राज्यात शासनाने गुटखा बंदी लागू केली. त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा त्याचे वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. अमरावतीत सह. आयुक्त व सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी कार्यरत असतानाही गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर त्यांचा धाक उरलेला नसल्याने या कायद्याची पायमल्ली होत आहे. फक्त शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अधिकारी काही ठिकाणी कारवाया करीत असल्याचे वास्तव आहे.

पानटपरी सुरू करण्यास परवानगी नाही
लॉकडाऊनमध्ये पानटपरी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास प्रशासाने मनाई केली आहे. पानटपरीचालकांना अद्याप पानटपरी सुरू करण्यास परवानगी मिळाली नाही. तरही काही पानटपरी चालकांनी नियमांचे उल्लघंन करीत पानटपऱ्या उघडल्या आहेत, याकडे महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे दुर्लक्ष आहे.

इतर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारी आणून एक स्वतंत्र कारवाई मोहीम राबविण्यात येईल. गुटखा विक्री करताना आढळून आल्यास कारवाई करू.
- सुरेश अन्नपुरे, सह. आयुक्त एफडीए

Web Title: Gutkha is widely sold in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.