परतवाड्यातून धान्याची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:18+5:30

अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ट्रक क्रमांक एमएच १७ एजी ३३४१ पकडला होता. यात तांदळाचे ४०० कट्टे होते. सुमारे २०० क्विंटल तांदूळ या ट्रकमध्ये आढळून आला होता. या दरम्यान अमरावती-परतवाडा रोडवरील फौजी धाब्यामागील एमआयडीसी भागातील गोडऊनमध्ये विशेष पथकासह अचलपूर पुरवठा विभागाला परत तांदूळ आढळून आला.

Grain smuggling from Paratwada | परतवाड्यातून धान्याची तस्करी

परतवाड्यातून धान्याची तस्करी

Next
ठळक मुद्दे‘त्या’ तांदूळ प्रकरणी गुन्हा दाखल : धान्य तस्करांचे जाळे सक्रिय, शासकीय मालाची अफरातफर

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर-चांदूर बाजार नाक्यावर पकडलेल्या ट्रकमधील तांदूळ प्रकरणात गुरुवारी अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अचलपूर तहसीलमधील पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी कृष्णकुमार अग्रवाल (रा. परतवाडा) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.
अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ट्रक क्रमांक एमएच १७ एजी ३३४१ पकडला होता. यात तांदळाचे ४०० कट्टे होते. सुमारे २०० क्विंटल तांदूळ या ट्रकमध्ये आढळून आला होता. या दरम्यान अमरावती-परतवाडा रोडवरील फौजी धाब्यामागील एमआयडीसी भागातील गोडऊनमध्ये विशेष पथकासह अचलपूर पुरवठा विभागाला परत तांदूळ आढळून आला. या गोडाऊनमध्ये तांदळाचे ५० किलो वजनाचे ३४५ कट्टे मिळून १७२.५० क्विंटल मिळून व १०० किलो वजनाचे २२ मोठे कट्टे मिळून १९४.५० क्विंटल तांदूळ आढळून आला. हा संपूर्ण तांदूळ शासकीय वितरणातील आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मोफत वाटप केला गेलेला हा तांदूळ आहे. हा मोफतचा तांदूळ कृष्णकुमार अग्रवाल (रा. परतवाडा) यांनी आदिवासी लाभार्थींकडून विकत घेतला, खरेदी केला आणि गोडाऊनमध्ये साठवून ठेवला. या तांदळाचे खरेदी-विक्रीबाबत कुठलीच पावती अथवा दस्तावेज अग्रवालकडे आढळून आला नाही. त्यांनी तो सादरही केला नसल्याचे पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. मालाची किंमतही तक्रारीत दिलेली नाही.

गोडाऊनमध्ये पोत्यांची अदलाबदल
अचलपूर-परतवाड्यात शासकीय धान्य मोठ्या प्रमाणात विकत घेतले जाते. हे धान्य विकत घेणाऱ्यांचे मोठे गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्येच शासकीय धान्याच्या पोत्यांची अदलाबदली केली जाते. हे धान्य राजरोसपणे मध्यप्रदेश, हैद्राबादसह महाराष्ट्रातील गोंदिया, भंडाऱ्याकडे पाठविले जाते. या धान्यतस्करांची व त्यांच्या गोडाऊनची माहिती प्रशासनाकडे आहे. यातील काही तस्कारांविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. तरीही राजरोस धान्य तस्करी सुरूच आहे.

संचालक पद रद्द
कृष्णकुमार अग्रवाल हे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अडते व व्यापारी म्हणून होते. यातूनच ते बाजार समिती संचालक म्हणून निवडून आले होते. या दरम्यान २०१७-१८ मध्ये त्यांचेविरूद्ध जिवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे बाजार समितीने त्यांचे लायसन्स रद्द केले. लायसन्स रद्दमुळे आपसुकच त्यांचे संचालक पद गेले. यावर त्यांनी न्याय न मिळाल्याने त्यांनी शासनाकडे अपील दाखल केले असून तेथे ते प्रलंबित आहे.
दुसरा गुन्हा
कृष्णकुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध २०१७-१८ मध्येही जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याही प्रकरणात शासकीय तांदूळच त्यांच्याकडून प्रशासनाने ताब्यात घेतला होता. अशाच तांदूळ प्रकरणात २५ जूनला दुसऱ्यांदा त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय अनुदानित धान्य कुणालाही विकत घेता येत नाही. ते केवळ लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानातूनच वितरित करण्याकरिता उपलब्ध आहे.
- शैलेश देशमुख, पुरवठा निरीक्षण अधिकारी, अचलपूर.

Web Title: Grain smuggling from Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.