अवैधदारुसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:48+5:302021-02-23T04:20:48+5:30

अमरावती : अवैध दारुची वाहतूक करीत असताना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी दिवसभर सात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून अवैध ...

Four and a half lakh items including illegal drugs seized | अवैधदारुसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैधदारुसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

अमरावती : अवैध दारुची वाहतूक करीत असताना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी दिवसभर सात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून अवैध दारूसाठ्यासह ४ लाख ४२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत यशोदानगर परिसरात केलेल्या कारवाईत आरोपी साहिल अरुण सोळंके (२०, रा. विलासनगर) याच्या ताब्यातून दुचाकी व ८,४०० रुपयांची दारू असा एकूण १ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई राजापेठ ठाण्यांतर्गत लक्ष्मी स्वॉ मिल परिसरात करण्यात आली. आरोपी उदय अंबादास गायकवाड (३८, रा. विलासनगर याच्या ताब्यातून तीन हजारांची दारू व दुचाकी असा एकूण ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तेथेच दुसऱ्या कारवाईत २१०० रुपयांच्या दारुसह दुचाकी असा एकूण ६२,१०० रूपयाचा मुद्दमाल पकडला. सिटी कोतवाली ठाणे हद्तील बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी शंकर जाधव (२८),अन्य एक ताब्यातून ६१०० रुपयांची दारू व दुचाकी असा एकूण ४६,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात प्रफुल्ल ठाकरे व कृणाल रामकुमार तिवारी याच्या ताब्यातून १८०० दारू व दुचाकी असा एकूण ६१,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाडगेनगर हद्दीतील विलासनगर येथे केलेल्या कारवाईत आरोपी मनीष प्यारेलाल साहू (३०) याच्या ताब्यातून ३११० रुपयांची दारू व दुचाकी असा एकूण २३,११० रुपयांचा मुद्देमाल, तर कोतवाली ठाणे हद्दीतील मुख्य टपाल कार्यालयाजवळ केलेल्या कारवाईत आरोपी नीलेश गावंडे(४०) याच्याकडून १२७२० रुपयांची दारू व दुचाकी असा ६२,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने केली.

Web Title: Four and a half lakh items including illegal drugs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.