बडनेऱ्यातील उडाणपूल झाला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:56 PM2019-09-16T23:56:46+5:302019-09-16T23:57:03+5:30

गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Flight risk in Badenya rises | बडनेऱ्यातील उडाणपूल झाला धोक्याचा

बडनेऱ्यातील उडाणपूल झाला धोक्याचा

Next
ठळक मुद्देप्रशासन झोपेत : साईड शोल्डर, खड्डे ठरताहेत जीवघेणे

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : साईड शोल्डर व रस्त्यामधील प्रचंड गॅप, खड्डेच खडे, फुटपाथ फुटणे, कठडेच नसणे यामुळे गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
जुन्या वस्तीतून जाणाऱ्या महामार्गावरील गांधी विद्यालयासमोरील उड्डाणपूल अत्यंत धोक्याचा ठरत आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या उड्डाणपुलावर खड्डेच - खड्डे पडले असून, दोनही बाजंूनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. रस्ता व साईड शोल्डर यामध्ये मोठी गॅप तयार झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झुडुपी वाढली आहेत. आधीच हा उड्डाणपूल अरूंद आहे. वाहतुकीची वर्दळ सतत राहत असल्याने वाहनचालकांना कसेबसे आपला मार्ग काढावा लागतो आहे. रस्ता व साईड शोल्डरची गॅप जीवघेणी ठरत आहे. नुकताच शुभम वाठ नामक तरुणाचा यात बळी गेला. त्यानंतर प्रशासनाने थातूर-मातूर मुरूम टाकला आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासन तात्पुरती कामे करीत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे ठोस काम केव्हा करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अजून किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अपुरी प्रकाश व्यवस्था पादचाऱ्यांसाठी जीवघेणी
गांधी विद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या संपूर्ण दुरवस्थेला प्रशासनच जबाबदार आहे. यामुळेच आपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता व साईड शोल्डरमधील गॅप जीवघेणी ठरत आहे. अपुरी प्रकाश व्यवस्था तसेच पुलावर असणारे फुटपाथ पादचाºयांसाठी जीवघेणे ठरत आहे.

अरुंद पुलामुळे अपघाताचा धोका
गांधी विद्यालय नजीकच असल्याने वाहनांची मोठी वर्दळ राहते. त्यामानाने उड्डाणपूल अरूंद आहे. त्यात साईड शोल्डर व रस्ता यामधील गॅप दुचाकीस्वारांसाठी धोक्याची ठरत आहे. मोठे वाहन आले की दुचाकीस्वारांना मार्ग काढताना धोका पत्करावा लागतो.

Web Title: Flight risk in Badenya rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.