यशोगाथा : स्पर्धा परीक्षेतही यश मिळविण्याचा मानसअमरावती : जिल्हा परिषद माध्यमिक सांयस्कोअर शाळेतील दोन्ही डोळयांनी अंध असलेल्या योगेश नारायण मिटकरी याने अंधत्वावर मात करीत ८०.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्ह्यात एकमेव इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाचे एकमेव युनिट केवळ सायंस्कोअर शाळेत आहे. इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेला पाच विद्याथी बसले होते. यापैकी पाचही विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत शाळेतून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या योगेश मिटकरी हा अंध विद्यार्थी वाशीम जिल्ह्यातील बोरखेडा या गावातील रहिवासी आहे. तो येथील भिवापूरकर अंध विद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. त्याने सायंस्कोअर शाळेतील अंध युनिटमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण केले. याच शाळेतून अंधत्वावर मात करीत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. आई वडील शेतकरी असून अंध योगेश मिटकरी याने रामकृष्ण विद्यालयाचा १३ वर्षीय विद्यार्थी दर्शन कोसे या रायटरच्या माध्यमातून सुयश मिळविले आहे. शिक्षणात सर्वाधिक महत्वाचा क्षण असलेल्या इयत्ता दहावी परिक्षा आहे. परिीक्षेच्या एक आठवडा अगोदर आपल्या रायटर मिळाला, अशातच अंध विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम ब्रेल लिपीत असून एक धडा वान्यासाठी तब्बल चार तास लागत असल्याचे योगेशने लोकमतशी बोलतांना सांगीतले. आपल्याला जे यश मिळाले त्यावर आपन समाधानी आहो.मात्र परिक्षेचा अगोदर रायटर मिळाला असता तर यापेक्षा जास्त गुण मिळत होते. असे सांगत त्याने ज्या रायटर सहकाऱ्यामुळे यश मिळाले त्याबद्दलही समाधानी आहो. निकालानंतर आता पुढे अकरावी, बारावी त्यानंतर ग्रॅज्युएटचे शिक्षण पुर्ण करून स्पर्धा परिक्षेतून मोठया पदावर पोहण्याचा योगेशचा मानस असल्याचे त्याने सांगीतले. यायशात शिक्षिका देशपांडे, मुख्याध्यापक छाया पाटील, सर्व शिक्षक व आई आणि वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांने सांगीतले. (प्रतिनिधी)
अंध योगेश मिटकरी सायन्सस्कोअरमध्ये प्रथम
By admin | Updated: June 9, 2015 00:34 IST