नवनीत राणा यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवरील अंतिम सुनावणी हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:48+5:30

नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम युक्तिवाद करण्यासाठी अमरावतीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारची तारीख निश्चित केलेली होती. याचिकाकर्ता या नात्याने नवनीत राणा ठरल्यावेळी सकाळी ११.३० च्या ठोक्याला न्यायालयात उपस्थित झाल्यात. तथापि, माजी खासदार आनंदराव अडसूळ, प्रकाश मंजलवार, नितीन तारेकर आणि त्यांचे वकील आशिष लांडे न्यायालयात अनुपस्थित राहिले.

The final hearing on Navneet Rana's revision petition has been finalized | नवनीत राणा यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवरील अंतिम सुनावणी हुकली

नवनीत राणा यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवरील अंतिम सुनावणी हुकली

Next
ठळक मुद्देआनंदराव अडसूळ गैरहजर : न्यायालयाने दिली पुन्हा एक संधी

अमरावती : खासदारपदी निवडून येण्यापूर्वीच नवनीत राणा यांनी तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण याचिकेवरील गुरुवारी होणारा अंतिम युक्तिवाद प्रतिवादी पक्षाच्या अनुपस्थितीमुळे हुकला.
नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम युक्तिवाद करण्यासाठी अमरावतीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारची तारीख निश्चित केलेली होती. याचिकाकर्ता या नात्याने नवनीत राणा ठरल्यावेळी सकाळी ११.३० च्या ठोक्याला न्यायालयात उपस्थित झाल्यात. तथापि, माजी खासदार आनंदराव अडसूळ, प्रकाश मंजलवार, नितीन तारेकर आणि त्यांचे वकील आशिष लांडे न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यामुळे अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. न्यायासनाने १२ मार्चला पुन्हा एकदा अंतिम युक्तिवादासाठी संधी उपलब्ध करून दिली. नवनीत राणा यांच्यावतीने वकील परवेझ खान न्यायालयात उपस्थित होते. युवा स्वाभिमानचे वकील दीप मिश्रा यांचीही यावेळी उपस्थिती होती. वकील अनिल जयस्वाल, वकील वसिम शेख, वकील समीर पठाण हे मुख्य वकिलांना साहाय्य करीत आहेत.

काय आहे प्रकरण?
आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध नवनीत राणा यांनी १६ मार्च २०१४ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अडसूळ यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४, २९४, १४३, १४९, ३२३, ५०६ (ब) आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणाचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. एकतर्फी प्रकरण फाईलबंदही करण्यात आले. या प्रकरणाची नवनीत राणा यांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. माहिती मिळणे हा फिर्यादीचा अधिकार आहे. त्यामुळे प्रकरण एकतर्फी बंद करण्यात येऊ नये, या मागणीसाठी पुनर्निरीक्षण याचिका नवनीत राणा यांनी दाखल केली होती.

Web Title: The final hearing on Navneet Rana's revision petition has been finalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.