येवदा परिसरात ‘मोझॅक’ची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:43+5:30

पोळ्याच्या मागेपुढे बाजारात येणारे मुगाचे पीक यंदा मोझॅकमुळे धोक्यात आले आहे. तीन वर्षांपासून मूग, उडीद, सोयाबीन हे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या घरी येण्यापूर्वी बाद होत आहे. खारपाणपट्ट्यावर याच पिकावर शेतकºयांची भिस्त असते. यावर्षी तालुक्यात १३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रात मुगाची पेरणी झाली आहे.

Fear of ‘mosaic’ in Yevda area | येवदा परिसरात ‘मोझॅक’ची धास्ती

येवदा परिसरात ‘मोझॅक’ची धास्ती

Next
ठळक मुद्देमुगाची पाने सुकली : शेतकऱ्यांचा फवारणीवर भर, कृषितज्ज्ञांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : परिसरातील शेतकरी खरीप पिकांवर आलेल्या मोझॅक रोगाने धास्तावले आहेत. खारपाणपट्ट्यातील दर्यापूर तालुक्यात रोखीचे पीक असलेल्या मुगाची पाने या रोगामुळे सुकून गळून पडत असल्याने त्यांचा फवारणीवर भर आहे. कृषितज्ज्ञांनी पाहणी करून उपाययोजना सांगू, असे म्हटल्याने त्यांच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत.
पोळ्याच्या मागेपुढे बाजारात येणारे मुगाचे पीक यंदा मोझॅकमुळे धोक्यात आले आहे. तीन वर्षांपासून मूग, उडीद, सोयाबीन हे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या घरी येण्यापूर्वी बाद होत आहे. खारपाणपट्ट्यावर याच पिकावर शेतकºयांची भिस्त असते. यावर्षी तालुक्यात १३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रात मुगाची पेरणी झाली आहे.  येवदा, वडनेर गंगाई, पिंपळोद, उमरी ममदाबाद, उमरी बाजार, सांगळुद, अंतरगाव, इटकी, घोडचंदी शहीद, राजखेड, रामागड, पिंपळखुटा, सासन, तेलखेडा, कातखेडा, वरूड बुद्रुक, एरणगाव या परिसरातील ४५ टक्के लोकांनी मूग, उडीद यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांना पसंती दर्शविली. मजुरांची कमतरतादेखील त्याला कारणीभूत आहे. दोन वर्षांपासून अतिरिक्त पावसामुळे व पांदण रस्त्याअभावी ही पिके शेतकºयांच्या घरी फारच अल्प प्रमाणात आली. तरीदेखील यावर्षी मूग पिकाला प्राधान्य दिले. परंतु, पिकावर मोझॅकचा प्रादुर्भाव झाला.
पहिल्यांदाच मुगावर
मूग पीक फूल, शेंगांवर असताना वरपासून खालपर्यंत पाने सुकली आहेत. फवारणीने दुरुस्त होईल, या आशेने शेतकºयांनी अनेक फवारण्या केल्या. शासकीय तंत्रज्ञ सोनल नागे, कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, मंडळ कृषी अधिकारी सचिन राठोड, घनश्याम कळसकर, राजाभाऊ तराळ, प्रशांत हाडोळे व कृषी सहायकांच्या चमूने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नुकसानाची पाहणी केली. तज्ञांच्या मते, हा रोग सोयाबीन पिकावर येत असतो. परंतु यावर्षी पहिल्यांदाच तो मुगावर पसरला आहे. तो व्हायरल असल्याने अनेक शेतांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. पिकावर अधिक खर्च करू नये. या रोगाचे संशोधन करून त्यावर उपाययोजना सांगू, असे सांगून चमूने काढता पाय घेतला. नुकसानाचे तातडीने पंचनामे करावेत, अशी आता शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Fear of ‘mosaic’ in Yevda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती