‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:33+5:30

योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.

Farmers waiting for 'PM Kisan Samman' | ‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । बहुतेकांना पहिलाच हप्ता नाही; वर्षभरापासून प्रक्रिया, हेलपाट्यांना नाही पारावार

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३९ हजार ७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. हा डेटा केंद्र शासनालादेखील पाठविण्यात आला. यापैकी बहुतेकांना दोन हजारांचा पहिला हप्ताच मिळालेला नाही. शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.
केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी जिल्ह्यात २,३९,७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा प्रशासनाने हा डेटा केंद्र शासनाला पाठविला. यामध्ये ८,१६५ शेतकºयांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्यात. यापैकी ११९ शेतकऱ्यांनी मागील महिन्यापर्यंत त्रुटीची पूर्तता केली असली तरी अद्यापही ८,०४६ शेतकऱ्यांची माहिती अपूर्णच आहे. त्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.
दुसऱ्या टप्प्यात १ लाख २७ हजार ६९८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी १ लाख १८ हजार ३९८ शेतकºया हे मानधन मिळाले. उर्वरित १०६ शेतकऱ्यांच्या खात्यात हे मानधन जमा झालेले नाही.
तिसऱ्या टप्प्यात ६५ हजार ८८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी ४६ हजार १२ शेतकऱ्यांच्या खात्यात मानधन जमा झाले, तर ५४ शेतकऱ्यांना त्रुटीमुळे हे मानधन जमा झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पाच टक्के लाभार्थींची पडताळणी
योजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा राज्याचे कृषी आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र शासनस्तरावरून देण्यात आली, तर २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हाधिकाऱ्यांना करावयाची होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरही वंचित शेतकऱ्यांना मानधन मिळालेले नाही.

योजनेत तालुकानिहाय शेतकरी सहभाग
योजनेमध्ये अचलपूर तालुक्यातील १९ हजार ५५० शेतकरी, अमरावती १४ हजार २३२, अंजनगाव सुर्जी १८ हजार ४०३, भातकुली १३ हजार ९६२, चांदूर रेल्वे १२ हजार ८०७, चांदूर बाजार २१ हजार १०९, चिखलदरा १२ हजार ४१५, दर्यापूर १९ हजार ६५०, धामणगाव रेल्वे १७ हजार ६८७, धारणी १५ हजार ७८५, मोर्शी १८ हजार ७४१, नांदगाव खंडेश्वर १८ हजार २०८, तिवसा १५ हजार ९९४ आणि वरूड तालुक्यातील २१ हजार ९९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Web Title: Farmers waiting for 'PM Kisan Samman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.