कोविड रुग्णालय स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:50+5:30

शहरात खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय स्थापित होत आहे. येथे १०० डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व स्टाफचा रुग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहातच निवास असेल. दहा दिवसांसाठी हा स्टाफ नियुक्त असेल.

Establishment of Covid Hospital | कोविड रुग्णालय स्थापन

कोविड रुग्णालय स्थापन

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांची भेट : १०० आरोग्य अधिकारी, कर्मचारी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी येथील विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयात स्वतंत्र कोविड रुग्णालय स्थापण्यात आले आहे. येथे सुमारे १०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी येथे भेट देऊन विविध सूचना दिल्या.
शहरात खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय स्थापित होत आहे. येथे १०० डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व स्टाफचा रुग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहातच निवास असेल. दहा दिवसांसाठी हा स्टाफ नियुक्त असेल. त्यानंतर या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास नवा स्टाफ नियुक्त होईल. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
डॉक्टर, पारिचारिका, इतर कर्मचारी वर्ग निष्ठापूर्वक सेवा बजावत आहेत. या काळात जागरूक राहून स्वत:चीही काळजी घ्यावी. कुठलीही अडचण आल्यास तात्काळ कळवावे. साधनसामग्री, औषधसाठा सुसज्ज ठेवावा, शिफ्टनुसार अधिकारी- कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी, आदी निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. तुळशीदास भिलावेकर, डॉ. प्रशांत घोडाम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, पारिचारिका, सुरक्षा रक्षक आदी यावेळी उपस्थित होते. राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी हे रुग्णालय स्थापण्यासाठी निर्देश दिले होते

१०० बेडचे रुग्णालय
रुग्णालयात नियुक्त अधिकारी व कर्मचारी हे शिफ्टमध्ये सेवा देणार आहेत. तळमजल्यावर नोंदणी विभाग, पहिल्या मजल्यावर कोव्हिड-१९ संशयित तपासणी व विलगीकरण कक्ष १ व २ तसेच दुसऱ्या मजल्यावर रुग्ण कक्ष असेल. चौथ्या मजल्यावर आयसीयू कक्ष १ व २ निर्माण करण्यात आला आहे. हे रुग्णालय १०० खाटांचे असून, ६० खाटा कोरोना पॉझिटिव्ह, तर ४० खाटा संशयित रुग्णांसाठी आहेत.

Web Title: Establishment of Covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.