‘नकुशी’ला सोडून मातेचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:52+5:30

होलीकॉस होम फॉर बेबीज सेंटरच्या बाजूलाच असणाऱ्या होलीक्रॉस कॉन्व्हेंट बेथनी येथे सिस्टर मंडळीचे निवासस्थान आहे. दुपारच्या सुमारास शाळेला सुटी झाल्यानंतर सिस्टर सुरेखा आपल्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यावेळी त्यांना टेबलवर कथ्थ्या रंगाच्या शॉलमध्ये एक बाळ गुंडाळून ठेवले असल्याचे आढळले. त्यांनी बाळाचे निरीक्षण करून ट्रिझा जोस यांना याबाबत माहिती दिली.

The escape of the mother, leaving 'Nakushi' | ‘नकुशी’ला सोडून मातेचे पलायन

‘नकुशी’ला सोडून मातेचे पलायन

Next
ठळक मुद्देहोलीक्रॉस कॉन्व्हेंटच्या बेथनी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सात दिवसांच्या नवजात मुलीला शहरातील होलीक्रॉस कॉन्व्हेंट बेथनीमधील टेबलवर सोडून मातेने पलायन केले. सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आला. या घटनेच्या माहितीवरून चाईल्ड लाईनसह कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करून पुढील कार्यवाही सुरू केली होती.
होलीकॉस होम फॉर बेबीज सेंटरच्या बाजूलाच असणाऱ्या होलीक्रॉस कॉन्व्हेंट बेथनी येथे सिस्टर मंडळीचे निवासस्थान आहे. दुपारच्या सुमारास शाळेला सुटी झाल्यानंतर सिस्टर सुरेखा आपल्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यावेळी त्यांना टेबलवर कथ्थ्या रंगाच्या शॉलमध्ये एक बाळ गुंडाळून ठेवले असल्याचे आढळले. त्यांनी बाळाचे निरीक्षण करून ट्रिझा जोस यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ क्रमांकावरदेखील देण्यात आली. त्यानंतर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील चाइल्ड लाइनचे समुपदेशक अजय देशमुख व शंकर वाघमारे होलीकॉस कॉन्व्हेंट बेथनी येथे पोहोचले. त्यांनी बाळाचे निरीक्षण केले. ती एका आठवड्याची नवजात असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. शॉलमध्ये गुंडाळलेली ती मुलगी गोंडस, देखणी आहे. तिला कानटोपी व गुलाबी काळपट रंगाची लंगोट घातले होते. अज्ञात महिलेने मुलीला तेथे आणून सोडल्याचे निदर्शनास आले. शेजारीच होलीक्रॉस होम फॉर बेबीज सेंटर असल्यामुळे संबंधित महिला मुलीला तेथे सोडून निघून गेल्याचे आढळले. चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी ही माहिती पोलिसांसह बाल कल्याण समितीला दिली. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळाचे होलीक्रॉस होम फॉर बेबीज सेंटरमध्ये पालन केले जाणार आहे.

बाळाचे नाव ठेवले क्रिस्टिना
प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन नाताळ काही दिवसांवर आला आहे. आमच्या घरात परमेश्वरानेच हे बाळ पाठविले आहे. त्यामुळे या बाळाचे नाव क्रिस्टिना ठेवल्याची माहिती सिस्टर सुरेखासह उपस्थित इतरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: The escape of the mother, leaving 'Nakushi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.