गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफी, कोरोना संसर्ग आदी कारणांमुळे सहकारक्षेत्रात वर्षभर रखडलेल्या ६४८ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर कायद्यानेच मोकळा झालेला आहे. प्रचलित सहकार कायद्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत वर्षभरानंतर मुदतवाढ देता येत नसल्याने कायद्यात सुधारणा करावी लागते. तूर्त तशी परिस्थिती नसल्याने निवडणुका घेणे हाच पर्याय शिल्लक आहे. त्यामुळेच जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.सहकारी संस्थांचे निवडणूक प्राधिकरणदेखील सकारात्मक असल्याने कुठेही आडकाठी न येता निवडणुकीचा मार्ग सुकर होईल. ह्यमिशेन बिगेन अगेनह्ण अंतर्गत आता सर्वत्र शिथिलता आलेली आहे. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोरोना संसर्गात आवश्यक खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीने पार पाडली व आता ग्रामीणचा ७० टक्के भाग व्यापलेल्या ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्येक मतदाराचा थेट संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा सहकारातील निवडणुका यापेक्षा अधिक सुटसुटीत आहेत. त्यातही आता कोरोनाचा संसर्गदेखील कमी झालेला असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ६४८ संस्थांच्या निवडणुकीस सहकार विभागदेखील अनुकूल आहे.कर्जमाफीच्या प्रक्रियेत सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने पहिल्यांदा निवडणूक लांबणीवर पडली, त्यानंतर कोरोना संसर्गामुळे पुन्हा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता ३१ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी परिस्थिती नाही. याशिवाय अलीकडे संसर्गदेखील कमी होऊन जिल्ह्याची घडी पूर्वपदावर येत आहे.नऊ बाजार समित्यांचीही निवडणूकजिल्ह्यातील १२ पैकी नऊ कृषिउत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ ऑक्टोबरअखेर संपुष्टात आला. या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ सहकार विभागाने दिली. कोरोना संसर्ग कमी झाल्याने अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, तिवसा, दर्यापूर अंजनगाव सुर्जी व अचलपूर बाजार समितीतही निवडणूक होण्याची शक्यता आहे.या आदेशान्वये होती मुदतवाढमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम (क) मधील तरतुदीप्रमाणे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यानुसार १८ मार्च व त्यानंतर १७ जून आदेशाने मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता मुदतवाढ देता येत नसल्याचे सहकार विभागाने सांगितले.
जानेवारीपासून सहकारातील 648 संस्थांची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST
सहकारी संस्थांचे निवडणूक प्राधिकरणदेखील सकारात्मक असल्याने कुठेही आडकाठी न येता निवडणुकीचा मार्ग सुकर होईल. ह्यमिशेन बिगेन अगेनह्ण अंतर्गत आता सर्वत्र शिथिलता आलेली आहे. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोरोना संसर्गात आवश्यक खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीने पार पाडली व आता ग्रामीणचा ७० टक्के भाग व्यापलेल्या ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे.
जानेवारीपासून सहकारातील 648 संस्थांची निवडणूक
ठळक मुद्देतिसरी मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपणार, प्रशासनाला शासनादेशाची प्रतीक्षा