जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून ‘शिक्षणोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:55+5:30

शिक्षणप्रक्रियेत होत असलेले बदल सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, याद्वारे नवनवीन विचारांचे आदान प्रदान होऊन सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी तालुकास्तरावर शिक्षणोत्सव साजरा करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २ मार्चला बजावले.

'Education festival' disobeys the orders of collectors | जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून ‘शिक्षणोत्सव’

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून ‘शिक्षणोत्सव’

Next
ठळक मुद्देभातकुली पंचायत समितीमध्ये आयोजन । आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासकीय कार्यक्रमास १५ एप्रिलपर्यंत मनाई आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती प्राधिकरणाचे जिल्हाध्यक्ष शैलेश नवाल यांनी ११ मार्चला सर्व शासकीय विभागांना बजावले. हे आदेश धुडकावून भातकुली पंचायत समितीद्वारे आवारातील सभागृहात शनिवारी शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षणप्रक्रियेत होत असलेले बदल सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, याद्वारे नवनवीन विचारांचे आदान प्रदान होऊन सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी तालुकास्तरावर शिक्षणोत्सव साजरा करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २ मार्चला बजावले. याच अनुषंगाने हा कार्यक्रम असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. कार्यक्रमासाठी ५० हजारांचे अनुदानदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहे.
जागतिक संकट ठरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमविणारे कोणतेच कार्यक्रम आयोजित करू नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी बजावले असतानाही हा कार्यक्रम घेण्यात आला. याविषयी आता शिक्षण वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कार्यक्रमात २२ स्टॉल
भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित शिक्षणोत्सवाच्या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व डायटचे अधिकारी उपस्थित होते. यात तालुक्यातील विविध शाळांतील २२ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ विद्यालय, शाळा स्वच्छता, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी व हात धुण्याची सुविधा, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, वाचन चळवळीशी संबंधित उपक्रम, मूल्यमापन संदर्भातील तंत्रज्ञान या नावीन्यपूर्ण पद्धती, अध्ययन निष्पत्ती, सौरऊर्जा, मध्यान्ह भोजन, किचन गार्डन, ज्ञानरचनावाद, जीवन कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे कलात्मक प्रदर्शन यामध्ये शिक्षकांनी ठेवले होते.

गर्दीच्या कार्यक्रमास मनाई आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांशी चर्चा झाली. संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल.
- नितीन व्यवहारे
नोडल आॅफिसर (आरडीसी)

जिल्हा ठिकाणी कार्यक्रमास मनाई आहे, असे उपशिक्षणाधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे पूर्वनियोजनानुसार कार्यक्रम घेण्यात आला.
- संतोष घुगे
गटशिक्षणाधिकारी, भातकुली.

मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी शिक्षक समितीने सीईओंकडे १२ मार्चला केली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, शिक्षक समिती

Web Title: 'Education festival' disobeys the orders of collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.